सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही ठिकाणच्या परिसरात १.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे. हा भूकंप खूप कमी तीव्रतेचा असल्याने कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही. Mild earthquake tremors in Solapur in the afternoon; Mysterious sound of Assam even in Mangalvedha
तरी नागरिकांनी अफवांना बळी न पडता कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तुषार ठोंबरे यांनी केले आहे.
आसाममध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. आसामधील सोनितपुर येथे हा भूकंप झाला आहे. या भूकपाची तीव्रता रिश्टल स्केलवर ४.४ एवढी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यानंतर दुपारी सोलापुरातही सौम्य धक्के जाणवले.
मंगळवेढा शहरासह जवळपासची खेडी व इतर काही तालुक्यात सोमवारी दुपारी 2.15 च्या सुमारास गूढ आवाजाने हादरली. भयभीत नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. आज सोमवारी दुपारी मंगळवेढा शहर आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दैनंदिनं काम सुरू झाली आणि साधारण 2.15 मिनिटांनी अचानक गूढ आवाज झाला.
गूढ आवाज होऊन जोरदार झटका बसल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले. या गूढ आवाजाने नागरिकांच्या मनात घर केले आहे. गूढ आवाजाने जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शमा पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव, होटगी स्टेशन, मंद्रुप, हिपळे, फताटेवाडी, औज आहेरवाडी, तिल्हेहाळ, कणबस व बोरूळ या परिसरामध्ये आज सोमवारी (ता.२९) दुपारी १.२० वाजेच्या दरम्यान सौम्य आवाज ऐकू आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची बाब तहसिलदार दक्षिण सोलापूर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास आणून आणून दिली.
सदर बाबीची पडताळणी करिता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, नवी दिल्ली यांच्याकडे शहानिशा केली असता, सोलापूर शहर (वालचंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी) परिसरातील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या भूकंप मापक स्टेशनमध्ये १.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त स्केलचा भूकंप खूप कमी तीव्रतेचा असल्याने कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही. तरी नागरिकांनी अफवांना बळी न पडता कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.