अक्कलकोट : सिन्नुर (ता.अक्कलकोट ) येथील गाणगापूर रोडने सिन्नुर गावच्या पुढे डाव्या बाजुला बंद पडलेले चंदनाच्या कारखान्यात शनिवारी (ता. २७ मे) साडेपाच वाजण्याच्या सुमारास जुगार अड्डयावर छापा टाकला. यात १७ जुगारींना ताब्यात घेऊन २४ मोटरसायकलीसह एकूण चौदा लाख पंचवीस हजाराचे जुगाराचे साहित्य जप्त केले. raid on gambling dens; Sinnur Akkalkot Solapur Gangapur Road Police arrested 17 persons including 24 bikes
बेकायदेशीर तीन पत्ते जुगार पैसे लावुन खेळत असताना १७ जणांना पकडुन त्यांचे २४ मोटरसायकली अंदाजे किंमत अकरा लाख सत्तर हजर रूपयाचा मुद्देमाल व रोख रक्कम दोन लाख पंचावन्न हजार सत्तर रु. असे एकूण चौदा लाख पंचवीस हजार सत्तर रु. चे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम तसेच मोटासायकलसह मिळुन आले.
अक्कलकोट द.पो.ठाणे मध्ये महा.जुगार प्रति. अधि प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
पोना रवी सुनिल माने यांनी फिर्याद दिली. आरोपी चाँद इब्राहिम पठाण (वय-३७ वर्ष रा. सिन्नुर) याने बेकायदेशीर जुगार अड्डा चालवून त्यामध्ये आरोपी सिध्दराम शिवशरणप्पा अळगी, (वय २९ रा. रेवणसिध्देश्वर कॉलनी अफजलपुर जि. कलबुर्गी), माधव जकप्पा हेम्यु (वय-६० रा. मलिकार्जुन चौक, अफजलपुर) सुनिल अशोक
पाटील (वय-२५ वर्ष रॉ, काकडे चौक, कलबुर्गी), बसवराज शिवपुत्रप्पा किणगी (वय-३७
वर्ष रा. सिद्धेश्वरनगर, अफजलपुर), मंजु मणप्पा हेग्मी (वय -२४ वर्ष रा. बसवेश्वर सर्कल,अफजलपुर), सचिन गुंडप्पा जमादार (वय-३९वर्ष रा. गाणगापुर मंदिर जवळ गाणगापूर) मुस्तका गफुर मुल्ला (वय-४१ वर्ष रा. दुधनी स्टेशन), मन्सुर कादर पठाण (वय ४३ वर्ष रा. गांधी चौक दुधनी), रेवणसिध्द काशिराया पाटील
(वय- ६५ रा. जोगुर ता. अफजलपुर), शंकर सातलिंग गायकवाड (वय- ४८ वर्ष रा. दुधनी स्टेशन), शिवराजकुमार सिध्दराम जेवरगी (वय- २८ वर्ष रा. सिन्नुर), चन्नप्पा सयदप्पा होसुन (वय २२ वर्ष रा. दुधनी), रमेश दत्ता जाधव (वय ३५वर्ष रा. दुधनी), नारायण माणिक पवार (वय २९ वर्ष रा. दुधनी), मारूती गंगाधर कासार (वय३५ रा. आतनुर ता.अफजलपुर), समीर दस्तगीर सरेंडगी वय २६ वर्ष रा. अफजलपुर) हे जुगार खेळताना आढळले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी वेगवेगळ्या कंपनीच्या २४ दुचाकी मोटरसायकल किंमत एक लाख सतरा हजार रु. व आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम दोन लाख पंचाव्वन हजार सत्तर रोख असे एकूण चौदा लाख पंचवीस हजार सत्तर रूपयेचा मुद्देमाल जप्त केला.
अधिक तपास अंमलदार कोळी हे करीत आहेत.
》 दुचाकी अडवून महिलेस हॉकी स्टिकने मारहाण; गणेश चेंबर येथील घटना
सोलापूर – दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेस अडवून हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. ही घटना रंगभवन परिसरातील गणेश चेंबर जवळ शनिवारी (ता.27) दुपारच्या सुमारास घडली.
संदेशा सागर मोरेश्वर (वय २७ रा. रंगभवन,द फर्स्ट चर्चच्या पाठीमागे ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी अभिजीत गायकवाड (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास संदेशा मोरेश्वर या आपल्या दुचाकीवरून औषध आणण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. गणेश चेंबर जवळ अनोळखी सहा जणांनी त्यांची दुचाकी अडविली. त्यांना हॉकी स्टिकने मारहाण केली . अशी नोंद सदर बाजार पोलिसात झाली आहे.