■ भाजपवर केली सडकून टीका
सोलापूर : नव्या संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक देशात प्रथमच राज्याभिषेक सोहळा पूर्ण करून घेतला आहे. The need for secular parties to come together to save the country; Former MP Sitaram Yechury’s appeal criticized by BJP Sadkoon Solapur नव्या इमारती पेक्षा देशात सामाजिक सलोखा यावर भाष्य करणे अपेक्षित आहे. पण ते होताना दिसत नाही. अदानी यांना पोसण्यात मोदी सरकारचा वेळ चालला आहे. आगामी काळात देशाला आणि देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षाने एकत्रित येण्याची गरज आहे. तसे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत, असे प्रतिपादन माकपचे माजी खासदार सिताराम येचुरी यांनी सोलापुरात केले.
सोलापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येचुरी म्हणाले की, आज देशाची अवस्था खराब झाली आहे. सर्वत्र महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. याची सरकारला कोणती ही चिंता नाही. पैलवानांवर अत्याचार होत आहेत, मणिपूरमध्ये हिंसाचार वाढत आहेत. मात्र सरकार पार्लमेंटचे उद्घाटन करण्यात व्यस्त आहे. वास्तविक पाहता संसद भवनची इमारत नवीन नाही तर मजबूत असणे आवश्यक आहॆ. नवीन संसद भवनाचे उद्घाटन करताना कोणालाही विश्वासात घेतले नाही, कोणतेही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. हे उद्घाटन म्हणजे मोदी यांचा राज्याभिषेकच होता.
2022 मध्ये संसदेत केवळ 56 दिवस कामकाज चाचले चालले तर मनमोहन सिंग यांच्या काळात 200 पेक्षा जास्त दिवस संसदेचे कामकाज चालू होते. यावरून भाजपला लोकांची किती चिंता आहे हे कळून येते. आज संसदेत 50 लाख कोटींचे बजेट केवळ पाच मिनिटात मंजूर करण्यात येते. हे दुर्दैव आहे. भाजपाकडून संविधान पायदळी तुडवले जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आगामी काळात लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राज्यात ज्यांची ताकद आहे तेथे त्या पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे. लवकरच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यापुढेही अशा अनेक बैठका होणार आहेत. संविधान वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी आज एकत्र येणे गरजेचेच असल्याचे माजी खासदार येचुरी म्हणाले.
• चौकशी मागे लावून विरोधकांना गप्प करण्याचे प्रयत्न
केंद्र सरकारकडून सहकारी संस्थांचा गैरवापर होत आहे. अनेक नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय चौकशी लावून त्यांना गप्प करण्याचे प्रयत्न होत आहेत. सहकारी संस्थांचा असा वापर यापूर्वी कोणत्याही सरकारच्या काळात झाला नव्हता. जे नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्या मागच्या चौकशी बंद करण्यात आल्या आहेत, असेही येचुरी म्हणाले.
• समोरची आव्हाने काय आहेत हे पाहून मतदान करा
देशभरामध्ये जातीपातीचे राजकारण करून सांप्रदायिक आणि ध्रुवीकरणाच्या नावाखाली हिंदू व्होट बँक मजबूत करण्याचा डाव आखला जात आहॆ. आज भाजप विरहीत व्होट बँक तयार करण्याची गरज आहॆ. मोदींचा चेहरा बघून लोक मतदान करत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या समोरची नेमकी कोणती आव्हाने आहेत हे पाहून जनतेने विचार केला पाहिजे, असेही येचुरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.