● शहर उत्तर आणि मध्य विधानसभेसाठी केली शिष्टाई
सोलापूर : गुरुवारी सकाळी ११.३० ची वेळ… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गाडी दत्तनगर येथील माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या निवासस्थानासमोर थांबली. Hey Master please pay attention where is Mahesh : Jayant Patil Vidhan Sabha Shistai Narsayya Adam NCP State President लागलीच आडम मास्तर यांनी जयंत पाटील व त्यांच्यासोबत असलेले माजी महापौर महेश कोठे, माजी आमदार दीपक साळुंखे यांचे स्वागत केले. पाटील यांनी मास्तरांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले व त्यांच्या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशनास शुभेच्छा दिल्या.
या भेठीत जयंत पाटील यांनी अहो, मास्तर आमच्या महेश कोठेकडे जरा लक्ष द्या. अशी विनंती करताच मास्तरांनी शहर उत्तरमध्ये माझे १० हजार सभासद मतदार आहेत, तुम्ही काळजी करु नका. फक्त त्यांना तिकडे (शहर मध्य) फिरकू देऊ नका असे सांगून कोठे यांचा व स्वतःचा ही मार्ग मोकळा करुन घेतला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दिवसभरात माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांच्या विवाहाला उपस्थिती दर्शवली. सकाळी माजी महापौर महेश कोठे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. तसेच माजी आमदार नरसय्या आडम यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जयंत पाटील यांचा सोलापूर दौरा हा राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत महापालिका जिंकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. यासाठी त्यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली आहे. दुसरीकडे माजी आमदार दिलीप माने हे ही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. एकीकडे दिग्गज नेत्यांना पक्षात घेताना दुसरीकडे राष्ट्रवादी मित्रपक्षही जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
मध्यंतरी राष्ट्रवादीने भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. त्याला माकपचे माजी आमदार आडम यांनी संमती दर्शवली होती. अनेकवेळा माजी आमदार आडम यांनी आपण महापालिकेत भाजपला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीसोबत जाऊ असे वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आडम मास्तर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर महेश कोठेही उपस्थित होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन औपचारिक गप्पा झाल्यावर जयंत पाटील यांनी आडम मास्तर यांना जरा आमच्या महेशकडे लक्ष द्यावे अशी विनंती केली. त्यावर मास्तर यांनी महेश कोठे यांना उत्तर कडे लक्ष देण्याचा सल्ला दिला तर मध्य मी तयारच आहे असे सांगितले.
वास्तविक पाहता महेश कोठे राष्ट्रवादी पक्षाकडून शहर मध्य मधून लढण्याची तयारी करत आहेत. शहर उत्तरमध्ये मास्तर यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांची मदत झाल्यास महेश कोठे यांचा मार्ग सोपा होईल, असे बोलले जात आहे तर दुसरीकडे सध्या शहर मध्य मध्ये राष्ट्रवादी आडम यांना पाठिंबा देऊ शकते.
या भागात कोठे यांचे वर्चस्व चांगले आहे. त्यामुळे दोन पद्मशाली आमदार निवडून येण्याची शक्यता असल्याचे गणित राष्ट्रवादकडून सध्या बांधले जात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी कोठे आणि मास्तर यांना एकत्र आणत शहर उत्तर आणि मध्य विधानसभा मतदारसंघासाठी शिष्टाई केली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
● कोठे तुम्ही आमच्याकडे येऊ नका : आडम
महेश कोठे यांच्याकडून शुभेच्छा घेताना मास्तरांनी आमच्या घरकुल योजनेचे शहर उत्तर मतदारसंघात दहा हजार सभासद आहेत लक्षात ठेवा, आम्ही निवडून आणतो तुम्हाला, येऊ नका आमच्याकडे (शहर मध्य) असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.