● शहरात उलट-सुलट चर्चा, माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर
सोलापूर : उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामावर नियंत्रण आणि निगराणी करण्याच्या उद्देशातून पोचमपाड कंपनीने स्मार्ट सिटीच्या सीईओ तथा महापालिका आयुक्त आणि इतर अधिकारी यांना अलिशान २ गाड्या दिल्या. Why are the municipal authorities interested in the life of the contractor? The tone of displeasure of former corporators is municipal parallel water channel महापालिका आयुक्तांना महापालिकेची गाडी उपलब्ध असताना मक्तेदार कंपनीने दिलेली अलिशान गाडी वापरावी का?, यावरून आता उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. माजी नगरसेवकांसह अनेकांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
अनेक वर्षानंतर उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अखेर अनेक विघ्न पार पाडत सुरू झाले. सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन व महापालिका यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. जुना मक्तेदार असलेल्या पोचमपाड कंपनीलाच नाट्यमयरित्या पुन्हा या कामाचा मक्ता देण्यात आला. वर्क ऑर्डर दिल्यानंतर या कंपनीने जॅकवेलसह जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. ११० किलोमीटरचे समांतर जलवाहिनीचे काम आहे.
दरम्यान, सोलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओ तथा महापालिका आयुक्त आणि मुख्य तांत्रिक अधिकारी व पथकाकडून या कामाची वेळोवेळी नियमितपणे पाहणी व नियंत्रण करण्यात येणार आहे. त्यासाठी पोचमपाड कंपनीने महापालिका आयुक्तांसाठी इनोव्हा क्रीस्टा तर मुख्य तांत्रिक अधिकारी व पथक यांच्यासाठी स्कॉर्पिओ अशा दोन गाड्या दिल्या आहेत. या जलवाहिनीचे काम संपेपर्यंत या गाड्या महापालिका अधिकाऱ्यांच्या दिमतीला राहणार आहेत.
दरम्यान, पोचमपाड कंपनीकडून स्मार्ट सिटी सीईओ तथा महापालिका आयुक्तांसाठी अलिशान इनोव्हा क्रिस्टा गाडी तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी दिलेली आहे. सोमवारी महापालिका आवारात ही गाडी पहावयास मिळाली. दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या निगराणीसाठी ही गाडी दिली असली तरीही दुसरीकडे माजी नगरसेवकांमधून व पदाधिकाऱ्यांमधून या संदर्भात उलट सुलट चर्चा होत आहे. – नाराजीचा सूरही उमटत आहे.
यापूर्वी पोचमपाड कंपनीने हेच दुहेरी जलवाहिनीचे काम हाती घेतले असताना तत्कालिन सीईओ अथवा महापालिका आयुक्तांनी कंपनीची गाडी वापरली नव्हती. तांत्रिक अधिकाऱ्यांना या गाड्या दिल्या जातात. आयुक्त यांना महापालिकेच्या ताफ्यातील गाडीची सुविधा उपलब्ध आहे, असे असताना एखाद्या मक्तेदार कंपनीकडून देण्यात आलेली अलिशान अशी गाडी आयुक्तांनी वापरावी का? या संदर्भातही नाराजीचा सूर उमटत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 हा सर्व मिलीभगतचा प्रकार आहे : चेतन नरोटे
सर्व भ्रष्ट्राचाराने फोफावले आहे. हा मिलीभगतचा प्रकार वाटत आहे. दुहेरी जलवाहिनीसाठी ४५० कोटीचे टेंडर पूर्वीच निघाले होते. मात्र हे सरकार टेंडर काढतात आणि पैसे खातात असा प्रकार सुरू आहे. अधिकाऱ्यांना गाड्या देणे म्हणजे भ्रष्टाचार असल्याचे वाटत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत आहे, मात्र त्यासाठी महापालिकेचे प्रयत्न नाहीत, जे सत्य आहे ते लोकांसमोर येईल, असे काँग्रेसचे माजी नगरसेवक चेतन नराटे म्हणाले.
》 अधिकाऱ्यांना खूष करण्यासाठीच : खरादी
पोचमपाड कंपनीचा मक्ता रद्द केला होता. मात्र आर्थिक व्यवहारातून पुन्हा त्याच कंपनीला मक्ता देण्यात आला हे भ्रष्ट्राचारच आहे. या टेंडरची चौकशी झाली आहे. अधिकाऱ्यांना खूष करण्यासाठी कंपनीने गाड्या दिल्या आहेत, अधिकाऱ्यांना गाड्या आहेत, मग गाड्या का दिल्या, यामागे काहीतरी मॅनेज आहे, असे एमआयएमचे माजी नगरसेवक रियाज खरादी म्हणाले.
》 नको त्याच गोष्टी पालिकेत : आनंद चंदनशिवे
यापूर्वी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने अधिकाऱ्यांना गाडी दिली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, नाही त्याच गोष्टीसाठी गाड्याचा वापर झाला. आज प्रभागात निधी नाही, पाणीपुरवठा विस्कळीत आहे. त्याकडे दुर्लक्ष आहे. प्रशासकाचे काम ठोस नाही. लोकांना सुविधा देण्यापेक्षा नको त्याच गोष्टी पालिकेत चालल्या आहेत, असे आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.