● …पण महापालिका म्हणते, शहरातील होल्डिंगबाबत होती बैठक
सोलापूर : विमानसेवेत अडथळा ठरणारी सिध्देश्वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्यासाठीची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली असून याच पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा नियोजन भवन येथे महापालिका आयुक्त यांनी गोपनीय बैठक घेतल्याचे वृत्त आहे. A secret meeting in the planning building regarding the ‘chimney’ of Siddheshwar sugar factory? Solapur Kadadi Airlines
जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख देखील बैठकीस उपस्थित होते. बांधकाम परवाना विभागाच्या सारिका अकुलवार यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, शहरातील अनधिकृत होर्डिंग बाबत ही बैठक होती. या बैठकीबाबत गोपनीयता राखण्यात आल्याचेही चर्चा होती.
होटगी रोडवरील सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनाधिकृत चिमणी पाडण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, असे पत्र देखील महापालिकेने हैदराबादच्या मक्तेदाराला नुकतेच पाठवले असल्याचे सांगण्यात आले होते. महापालिकेने अनधिकृत चिमणी पाडून घेण्याबाबत सिद्धेश्वर कारखान्याला ४५ दिवसांच्या मुदतीची नोटीस दिली आहे. येत्या ११ जूनला नोटीसीची मुदत संपत आहे. तर नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चिमणी पाडण्याची कारवाई होणारच, असे संकेत दिले होते.
केंद्राच्या उड्डाण योजनेत समाविष्ट असूनही सोलापुरातून विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. होटगी रोड विमानतळ परिसरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनची अनधिकृत चिमणी विमानसेवेला प्रमुख अडथळा असल्याने विमानसेवा सुरू होत नाही. चिमणी वाचवण्यासाठी कारखान्याने ५ ते ६ वर्षे न्यायालयीन लढा लढला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणी घेऊन महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कारखान्याला नोटीस बजावत अनधिकृत चिमणी पाडून घेण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत कारखान्याने अनधिकृत चिमणी पाडावी अन्यथा महापालिका पाडेल. येत्या ११ जूनला ही मुदत संपुष्टात येणार आहे, त्या काळात कारखान्याने स्वत:हून चिमणी काढून न घेतल्यास महापालिका मक्तेदाराच्या माध्यमातून चिमणी पाडणार आहे. त्याअनुषंगाने आता महापालिकेने चिमणी पाडकामाच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून नियोजन भवन येथे महापालिका आयुक्त आणि गोपनीय बैठक घेतली आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीबाबत महापालिका आयुक्तांनी गोपनीयता राखली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान महापालिकेने दिनायस कॉन्ट्रक्ट प्रा. लि. या हैदराबाद येथील कंपनीला १ कोटी १७ लाखांना चिमणी पाडकामाचे टेंडर देण्यात आले आहे. कारखान्याला चिमणी पाडकासाठी दिलेली मुदत ११ जूनला संपणार असून १० जूनपर्यंत आपण यंत्रणा तयार ठेवावी, असे पत्र महापालिका प्रशासनाने हैदराबादच्या मक्तेदार कंपनीला पाठवले आहे.
सन २०१८ मध्ये चिमणी पाडण्यासाठी महापालिकेची यंत्रणा मक्तेदारासह कारखाना स्थळावर गेली होती, तेंव्हा मोठा विरोध झाला होता. यावेळी देखील तीव्र विरोधाची शक्यता लक्षात घेऊन कारखाना परिसरात तैनात केला जाणार पोलिसांचा मोठा बंदोबस्त करावा लागण्याची शक्यता आहे. कारखाना परिसरात जमाव बंदी आदेश देखील लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ही गोपनीय बैठक झाल्याची चर्चा आहे.