● सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी
सोलापूर – अक्कलकोट (दक्षिण पोलीस ठाणे ) येथे दाखल असलेल्या २ महिला आणि ३ मुले अशा ५ जणांचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर फरार झालेल्या जाफर बाळू पवार (वय ६० रा. सिद्धापूर ता. मंगळवेढा ) या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल २० वर्षानंतर नुकतीच अटक केली. Accused who was absconding after committing five murders arrested after 20 years Court News Akkalkot Solapur Life imprisonment Human transport cell
पाच जणांचा खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायालयाने जाफर बाळू पवार (रा. सिद्धापूर ) याला १५ डिसेंबर १९९४ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात (मुंबई ) अपिल दाखल केले होते. सदरचे अपील उच्च न्यायालयाने १८ मे २००५ रोजी फेटाळले होते . असुन तेव्हा पासुन आरोपी मिळुन येत नव्हता.
सत्र न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपी यास पकडणे बाबत स्थायी वॉरंट काढले होते. नमुद गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सदर स्थायी वॉरंट बजावणीसाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.
सदर आरोपी हा रेकॉर्ड असुन त्याचे विरुध्द खुन, दरोडा, खुनासह दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, फसवणुक सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथील पाच जणाच्या खुनांच्या गुन्ह्यात न्यायालयाने सुनावलेली आजन्म कारावासाची शिक्षा टाळण्याकरीता आरोपी हा मागील 20 वर्षा पासुन त्याचे अस्तित्व लपविण्याकरीता वेगवेगळया ठिकाणी राहत होता.
स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. निरीक्षक धनंजय पोरे व फौजदार सुबोध जमदाडे यांचे पथकाने आरोपी याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त केली. आणि त्याला काल ५ जून रोजी सिध्दापूर (ता.मंगळवेढा ) येथे सापळा रचुन अटक केली .
अटकेतील जाफर पवार या आरोपीला सत्रन्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस आजन्म कारवासाची शिक्षा भोगण्याकरीता कारागृहात रवानगी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापुरातील दोन अपहृत अल्पवयीन मुली नवी मुंबईतून ताब्यात
● ग्रामीणच्या मानवी वाहतूक कक्षाची कारवाई
सोलापूर : टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींना ग्रामीणच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नवी मुंबईतून ताब्यात घेतले आहे.
मागील वर्षी टेंभुर्णी हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. त्या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली होती. गुन्हा दाखल झालेल्या तारखेपासून पीडित मुलींचा टेंभुर्णी पोलीस ठाण्याने शोध घेऊनही त्या सापडल्या नव्हत्या. त्यामुळे हा गुन्हा पुढील तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.
याचा तपास या कक्षाने करून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरुन तसेच सायबर सेलच्या मदतीने दोन्ही पीडित मुलींना घनसोली, नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
ही कारवाई या कक्षाचे पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड, पोलीस अंमलदार मंजुळा धोत्रे, सविता कोकणे, सूर्यकांत जाधव, सचिन वाकडे लक्ष्मण राठोड, प्रिती पाटील, प्रियंका सर्वगोड, तसेच सायबरचे व्यंकटेश मोरे यांनी केली.