सोलापूर : माजी आमदार रमेश कदम यांना तब्बल 6 वर्षानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी एका व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणून बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढले होते. Former MLA Ramesh Kadam granted bail after 6 years Mohol Annabhau Sathe Corporation loan fraud case त्यांनी याद्वारे अण्णाभाऊ साठे महामंडळाची 6 लाख 36 हजार 658 रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना 31 में 2017 अटक करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरेंनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला.
या प्रकरणी अधिक माहितीनुसार, रमेश कदम यांची आज्जी बायम्मा गणपत क्षीरसागर (रा. नांदनी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्या नावे बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यात आले. दुग्धव्यवसायासाठी कर्ज मंजुरीचे आदेश काढून ते वितरण करण्यासाठी कदम यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला. त्यातून शासनाची व महामंडळाची 6 लाख 36 हजार 658 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अनिल राघोबा म्हस्के यांनी 31 मे 2017 रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या कर्ज प्रकरणात शासनाची व महामंडळाची सहा लाख 36 हजार 658 रुपयांची फसवणूक केली, अशा आशयाची फिर्याद अनिल राघोबा म्हस्के यांनी 31 मे 2017 रोजी सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावेळी पोलिसांनी रमेश कदम यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी माजी आमदार रमेश कदम यांनी ऍड. मिलिंद थोबडे यांच्या मार्फत जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीवेळी ऍड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्याद उशिराने दाखल झालेली आहे, तसेच कर्ज मंजुरीची रक्कम ही देखील लाभार्थी बायम्मा क्षिरसागर हिच्या खात्यामधून फ्रीझ केलेली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता पूर्णत्वात आला असल्याचा युक्तिवाद मांडला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर रमेश कदम यांना जामीन मंजूर केला. अर्जदारतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारतर्फे ऍड. अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● बैलांची शर्यत पाहताना बैलाची धडक; एकाचा मृत्यू
अक्कलकोट : बैलांची शर्यत पाहण्यासाठी म्हणून बसलेल्या व्यक्तीला बैलाने धडक देऊन काही अंतर फरपटत नेले. यात जखमी होऊन व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना रविवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात घडली.
साहेबलाल मनापसाब मुल्ला (वय ६०) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (ता. ४) वागदरी गावात बैलांची शर्यत होती. ही शर्यत गाव परिसरातील मोकळ्या मैदानात ठेवण्यात आली होती. शर्यत बघण्यासाठी वागदरी गावासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी साहेबलाल हेही शर्यत पाहण्यासाठी तेथे गेले होते शर्यतीत धावणाऱ्या बैलाने त्यांना धडक दिली. त्यानंतर तसेच काही अंतर पुढे फरपटत नेले. यामुळे साहेब लाल हे डोक्याला, पायाला, हाताला तसेच सर्वांगास मार लागून जखमी झाले होते.
त्यांच्यावर अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर मुलगा इमाम यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. परंतु सोमवारी (ता. ५) रात्री उपचारादरम्यान साहेबलाल मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.