□ शासकीय रुग्णालयातील असुविधेवर आमदार कल्याणशेट्टी संतप्त
सोलापूर : बैलांची शर्यत पाहण्यासाठी म्हणून बसलेल्या व्यक्तीला बैलाने धडक देऊन काही अंतर फरपटत नेले. यात जखमी होऊन व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना रविवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात घडली. Akkalkot. A bull strike while watching a bull race; One died, MLA Kalyanshetty angry at Vagdari Government Hospital
साहेबलाल मनापसाब मुल्ला (वय ६०) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (ता. ४) वागदरी गावात बैलांची शर्यत होती. ही शर्यत गाव परिसरातील मोकळ्या मैदानात ठेवण्यात आली होती. शर्यत बघण्यासाठी वागदरी गावासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी साहेबलाल हेही शर्यत पाहण्यासाठी तेथे गेले होते शर्यतीत धावणाऱ्या बैलाने त्यांना धडक दिली. त्यानंतर तसेच काही अंतर पुढे फरपटत नेले. यामुळे साहेब लाल हे डोक्याला, पायाला, हाताला तसेच सर्वांगास मार लागून जखमी झाले होते.
त्यांच्यावर अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर मुलगा इमाम यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. परंतु सोमवारी (ता. ५) रात्री उपचारादरम्यान साहेबलाल मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
अक्कलकोटहून सोलापूरला आणले असता ऑक्सिजन बेड लवकर उपलब्ध झाला नाही. ताटकळत उभे राहावे लागले. यावर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली. ते सोलापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पत्नीने पतीच्या डोक्यात घातला दगड; चौघांवर गुन्हा
सोलापूर : विजापूर रस्त्यावरील एसआरपीएफ कॅम्पजवळील सासणेनगरात घराचे कुलूप तोडून संसारोपयोगी साहित्य टेम्पोतून नेताना पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घातला. याप्रकरणी चौघांविरुध्द विजापूर ‘नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सिद्राम धोंडिबा वाघमोडे (वय ३७, रा. सासणेनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पत्नी संगीता सिद्राम वाघमोडे, छोटा हत्ती एमएच १३ एएन ०७६७ व एमएच १३ एसी ०४५९ चे चालक व अन्य एक अनोळखी अशा चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे. दोन टेम्पोतून संगीता वाघमोडे या साहित्य घेऊन जात होत्या. त्यावेळी पतीने पत्नी संगीता हिला तू कोणाला विचारून घराचे कुलूप तोडलीस. व घरातील वस्तू का घेऊन जात आहे असे विचारल्याच्या कारणावरून तिच्यासोबत आलेल्या छोटा हत्ती वाहनाच्या चालकांनी व इतर एकाने मिळून पती सिद्राम यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच पत्नीने दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले आहे, फिर्यादीच्या शर्टाच्या खिशातील २० हजार रुपये काढून घेतल्याची फिर्याद सिद्राम वाघमोडे यांनी पोलिसात दिली आहे. अधिक तपास फौजदार वाल्मीकी हे करीत आहेत.