मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. यानंतर 10 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. यात भाजपचे 4 जण कॅबिनेट मंत्री तर 2 जण हे राज्यमंत्री असतील. 6 new ministers of BJP, 4 new ministers of Shinde group in Shinde government’s cabinet expansion! Politician Devendra Fadnavis Eknath Shinde शिंदे गटातील 2 जण कॅबिनेट मंत्री तर 2 जण राज्यमंत्री असतील, अशी माहिती समोर येत आहे. अन्य 13 रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भरली जावू शकतात. याबाबत अधिकृत अद्याप कोणीही माहिती दिली नाही.
शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असं शिंदेंनी म्हटल्याचे समोर येत आहे.
शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार 19 जून रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर असणाऱ्या नेत्यांचीच मंत्रीपदी वर्णी लागू शकते, याशिवाय ज्या मंत्र्यांमुळे सरकारला टीकेला सामोरं जावं लागलं, अशा मंत्र्यांची सुद्धा मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जाईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची माहिती काही वृत्तपत्रांनी दिली आहे. तर शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री उशीरा अमित शाह यांची भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत याची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. येथे त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची रात्री उशीरा भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हेच या भेटी मागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. अमित शाहांसोबत चर्चा करून पुढील निर्णय या बैठकीत ठरण्याची चर्चा आहे.
भाजप व शिवसेनेतील प्रत्येकी 10 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आमदारांची नावं देखील समोर आली आहे. भाजपकडून विदर्भ संजय कुटे, मुंबई योगेश सागर, किसन कथोरे, मनीषा चौधरी, रणधीर सावरकर, गणेश नाईक, पश्चिम महाराष्ट्र माधुरी मिसाळ, मराठवाडा मेघना बोर्डीकर, उत्तर महाराष्ट्र जयकुमार रावल, देवयानी फरांदे यांची नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
तर शिवसेना शिंदे गटाकडून कोकण योगेश कदम, भरत गोगावले, विदर्भ बच्चू कडू , संजय रायमूलकर, संजय गायकवाड, मराठवाडा संजय शिरसाट, प. महाराष्ट्र अनिल बाबर, प्रकाश आबिटकर मुंबई यामिनी जाधव, उ. महाराष्ट्र चिमणराव पाटील, सुहास कांदे यांना मंत्रिपद मिळू शकते अशी माहिती समोर येत आहे.