सोलापूर : सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठवाड्यातील एका विद्यार्थ्याने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. MBBS student commits suicide in Solapur, emotional letter written before suicide Govt Hospital
सोलापूर येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या, एका विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आकाश जोगदंड असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो एमबीबीएस पहिलेच वर्ष पास होत नसल्याने नैराश्यातून त्यांने हे पाऊल उचले. आकाश जोगदंड याने आत्महत्येपूर्वी भावनिक पत्र लिहिले होते.
मृत आकाश याने डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयात २०२० साली एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. परंतु वारंवार परीक्षा देऊन अपयश येत होते. सलग तीन वर्षे अपयशीच ठरल्याने तो नैराश्येत होता, अशी माहिती अनधिकृत सूत्रांनी दिली. या घटनेचा तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश जोगदंड याने आत्महत्येपूर्वी भावनिक पत्र लिहिले होते. माझ्या मृत्यूची माहिती आईला व बाबांना सांगू नका, ते सहन करणार नाहीत. मी आत्महत्या केल्याची माहिती माझ्या मामाना सांगा असा मजकूर लिहीत, आकाशने मामाच संपर्क क्रमांक चिट्टीत नमूद केला होता. सोलापूर पोलिसांनी आकाशच्या मामाला सोलापुरात बोलावून घेतले आहे. आकाशच्या मृतदेहावर सोलापूर पोलिसांनी पंचनामा करून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह दाखल केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एमबीबीएसची तयारी करणार्या विद्यार्थ्याला नैराश्याने ग्रासल्याने त्याने आत्महत्या केली. सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमधील विद्यार्थ्याने शहरातील रितेश हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची माहिती पसरताच शासकीय रुग्णालयात भावी डॉक्टरांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी अधिकृत माहिती दिली. आकाश संतोष जोगदंड (वय 24 रा. चौसळा, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
आकाश जोगदंड याने 2020 साली एमबीबीएसच्या प्रथम वर्षात सोलापुरातील डॉ व्ही एम मेडिकल कॉलेज या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. 2020 पासून तो सतत परीक्षा देत होता, मात्र पहिलेच वर्ष पास होत नसल्याने तो नैराश्यात गेला होता. तीन वर्षांपासून आकाश सतत नापास होत असल्याने तो तणावात जीवन जगत होता. अखेर आकाश जोगदंडने सोमवारी 5 जून रोजी सकाळी आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली. आकाश जोगदंडचे मामा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते.
आकाश जोगदंड हा एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. 2020 पासून तो सतत परीक्षा देत होता, मात्र पहिलेच वर्ष पास होत नव्हता त्यामुळे तो तणावात राहत होता. यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचले असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी सांगितले.