सोलापूर : ज्या नेत्यांना सोलापुरात कोणी विचारत नाही अशा नेत्यांना प्रदेशवर विचारले जाते, अशा लोकांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या केबिनमध्ये आणि गाडीमध्ये घेऊन बसतात, अशी तक्रार शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी मुंबई येथील बैठकीत केली. त्यामुळे नेमके ते पदाधिकारी कोण चेतन नरोटे यांचा नेमका रोख कोणाकडे होता, याची चर्चा आता काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. Priceless leaders in Nana Patole’s car: Chetan Narotenoa Who exactly has the cash? Argument started Solapur city president state president
मुंबईतील टिळक भवन येथे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर लोकसभा निहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी ही सहभागी होते. या बैठकीत चेतन नरोटे यांनी वरील तक्रार नाना पटोले यांच्याकडे केली.
शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी कोणाचेच नाव न घेता ही तक्रार केल्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नेमके चेतन नरोटे यांचा रोष कोणाकडे होता अशी चर्चा दिवसभर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चालू होती.
सध्या प्रदेशवर माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रा काकासाहेब कुलकर्णी, पल्लवी रेणके , प्रा नरसिंग आसदे, किसन मेकाले गुरुजी, सुदिप चाकोते,पंडित सातपुते, सुधीर लांडे, भीमराव बाळगे, नरसिंह असादे, यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच महिला काँग्रेसचे पदाधिकारीही प्रदेशवर आहेत.
या सर्व लोकांचे मुंबईला येणे जाणे असते आणि हेच पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे यातील कोणाकडे चेतन नरोटे यांचा रोख आहे का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. हे पदाधिकारी सोडून आणखी कोण आहेत का याबाबतही चवीने चर्चा होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
वास्तविक पाहता यातील बहुतांश नेमणुका या सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या सहमतीने आणि शिफारशीनुसार झाल्या आहेत. असे असताना चेतन नरोटे यांनी मुंबई येथील बैठकीमध्ये तक्रार करण्याचे काय कारण होते, या बैठकीत सोलापूर लोकसभेबाबत आढावा देण्याचे होते असे असताना चेतन नरोटे यांनी तक्रार का केली, असा सवाल उपस्थित होत आहॆ.
याच बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंका आणि आपापसातील मतभेद विसरा आणि काँग्रेसचे संघटन मजबूत करा असा सल्ला सर्वांना दिला असताना चेतन नरोटे यांनी ही तक्रार करत कोणाकडे आपला रोख वळवला याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तालुकाध्यक्षांचा सुरू असलेला वाद मिटतो ना मिटतो तोच आता चेतन नरोटे यांच्या या तक्रारीवरून आगामी काळात नवीन वाद काँग्रेसमध्ये निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ही तक्रार खुद्द नाना पटोले यांच्यासमोरच केली. यावेळी तीन माजी मुख्यमंत्री उपस्थित असताना खुद्द नाना पटोले चीच तक्रार केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत. त्यामुळे आगामी काळात नाना पटोले ही तक्रार गांभीर्याने घेणार का आणि यापुढील त्यांची भूमिका काय असणार याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.