》’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ महाआरोग्य शिबीर राबविणार
सोलापूर – यंदा 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. अनेक वारकरी हे पायी चालत आलेले असतात. Wari of Health, Door of Pandhari; The government will conduct free health check-up of lakhs of workers at the Maha Arogya Shibir Pandharpur त्यामुळे पंढरपुरमध्ये आल्यानंतर अनेकांना आरोग्याशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन यंदाच्या आषाढी वारीला राज्य सरकारकडून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूर येथील यात्रेत राज्य शासनाच्या वतीने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हे महाआरोग्य शिबीर राबवले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
आरोग्यमंत्री सावंत म्हणाले की, यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात प्रथमच राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ ह्या संकल्पनेवर आधारित हे महाआरोग्य शिबीर २८ आणि २९ जून रोजी पंढरपुरात राबवण्यात येणार आहे.या शिबिरात सुमारे २० लाख भाविकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथकं बोलण्यात येणार आहे. पंढरपुरात ३ ठिकाणी हे आरोग्य शिबिर राबवले जाईल.
यामध्ये आरोग्य शिबिरासोबतच वारकरी भक्तांना सकस आहार देखील दिला जाणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. आषाढी यात्रेमध्ये राज्य शासनाचे विविध कार्यक्रम आजपर्यंत राबवले गेले. मात्र आरोग्य शिबिरसारखा लोकोपयोगी उपक्रम प्रथमच पंढरपूर येथे राबवला जाणार असल्याचे डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आषाढी यात्रा कालावधीत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजनाबाबत पंढरपूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
● वाखरी पालखी तळ, 65 एकरची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी
आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी, भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्वभूमिवर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पालखी तळची पाहणी करून प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली. तसेच 65 एकरमध्ये मोठ्या प्रमाणात दिंड्या उतरतात. दिंड्यासोबत वारकरी, भाविक मोठ्या संख्येने असतात. या ठिकाणीही देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेवून आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या.