सोलापूर – आमच्या घराकडे वाईट नजरेने बघतो या संशयावरून काठीने मारहाण करून घरावर दगडफेक केल्याची घटना उळे (ता.दक्षिण सोलापूर ) येथे ३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात सोलापूर तालुका पोलिसांनी एकाच कुटुंबातील ३ महिलासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Stone pelting at house: Case registered against 10 people including three women Rajasthan laborer shovel death Solapur
यासंदर्भात गणपत सोमनाथ घाटे (वय ५० रा.उळे) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली . त्याप्रमाणे पोलिसांनी राहुल गुंड, मीना गुंड, लक्ष्मण गुंड, मनोज गुंड, निवृत्ती गुंड, गणेश गुंड , बाळू गुंड, शशिकांत गुंड, सुवर्णा गुंड आणि प्रगती गुंड (सर्व रा.ऊळे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या सर्वांनी मिळून गणपत घाटे यांना काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेक केली त्यात खिडकीच्या काचा फुटून एक हजाराचे नुकसान झाले, अशी नोंद पोलिसात झाली आहे.
● विवाहित इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – जुळे सोलापुरातील एमएसईबी प्लांट जवळ राहणाऱ्या महंतेश महालिंग सिद्धापूरमठ (वय ५३) या इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.
रात्री आठ वाजेच्या सुमारास महांतेश सिद्धापूरमठ याने घरातील बेडरूमच्या बाजूस असलेल्या गॅलरीतील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून प्रणव (मुलगा) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला. मयत महांतेश याच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. तो एलआयसी एजंट म्हणून काम करीत होता . या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही .
》खोदकाम करताना फावडा डोक्यात लागला; राजस्थानच्या मजुराचा मृत्यू
सोलापूर – जमिनीचे खोदकाम करताना डोक्यात फावडा लागल्याने राजस्थान मधील ३२ वर्षीय मजूर गंभीर जखमी होऊन मयत झाला . ही घटना गावडी दारफळ ता.उत्तर सोलापूर ) येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.
मूलचंद श्रीकिसन गुर्जर (वय ३२ रा. मंडल जि.बिलवाडा, राजस्थान) असे मयताचे नाव आहे . तो सकाळी १० वाजेच्या सुमारास गावडी दारफळ येथे खोदाईचे काम करीत होता . त्यावेळी हातातील फावडा डोक्यात लागल्याने तो चक्कर येऊन बेशुद्ध पडला होता. त्याला खाजगी दवाखान्यात उदयलाल गुर्जर यांनी दाखल केले होते. उपचारादरम्यान तो दुपारी मयत झाला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७७ हजाराचे दागिने पळविले ; माळशिरस येथील घटना
माळाशिरस – घरातील खोलीचा दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्याने शिताफीने पळविले . ही घटना माळशिरस येथे तलाठी कॉलनीत सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
तलाठी कॉलनीत राहणाऱ्या लैला अकबर शिकलगार (वय ६५ ) या उन्हाळा असल्याने आपल्या खोलीचा दरवाजा पुढे करून झोपल्या होत्या. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अनोळखी चोरटा त्यांच्या खोलीत प्रवेश केला. आणि त्या झोपेत असतानाच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवून नेले . यासंदर्भात शिकलगार यांनी माळशिरस पोलिसात फिर्याद दाखल केली .त्याप्रमाणे पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला . हवालदार माने पुढील तपास करीत आहेत .
》 गालावर हात फिरवत घेतले चुंबन; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : माझ्यासोबत बागेत येण्यास नकार दिल्यास आपले प्रेमसंबंध सोशल मिडियावर व्हायरल करतो म्हणून अल्पवयीन मुलीला बागेत नेले आणि तिचे चुंबन घेतले. पुढे काही करण्याच्या अगोदर ती रागावली अन् घरी आणून सोडले. आईला प्रकाराची कल्पना देऊन पिडित मुलीने त्या तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली.
ही घटना २८ मे रोजी घडली. याप्रकरणी ६ जून रोजी जाहीद उर्फ जैद हिरोली याच्या विरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यातील १६ वर्षाची अल्पवयीन मुलीला यातील आरोपीने २८ मे रोजी फोन करून मी तुला सोबत घेऊन जाणार आहे, नाही आल्यास आपले प्रेमसंबंध सोशल मिडियावर जाहीर करण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलगी आणि संशयित आरोपी बाईकवरुन बागेत गेले.
तेथे आरोपीने ‘तु मला आवडतेस, तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणून तिच्या गालावर हात फिरवून तिचे चुंबन घेतले.यामुळे पिडितेने रागावून पुढे काही करण्याच्या अगोदर प्रतिकार केला.अखेर त्याने बाईकवरुन पिडितेला घरी आणून सोडले.