● स्वतः दुचाकीवर पाठलाग करीत चालकाला पकडले
उस्मानाबाद : ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. भरधाव टिप्पर अंगावर येताच ओमराजे निंबाळकर यांनी उडी मारली आणि ते थोडक्यात बचावले. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीस अटक देखील करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर हे सकाळी व्यायाम करायला जात ही घटना घडली होती. Bhardhav tipper on the body … MP Omraj Nimbalkar narrowly escaped Osmanabad
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होतोय. ओमराजे निंबाळकर हे सकाळी 7 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथील आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच गेले होते. व्यायाम करून घरी परतत असताना 8 वाजून 32 मिनिटांनी पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परचा त्यांना आवाज आला. खासदार निंबाळकर यांनी पाठीमागे वळून पाहिले तर डंपर मोठ्या वेगाने त्यांच्या दिशेने येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले.
यावेळी डंपर चालकाच्या हातात मोबाईल होता. तर तो त्याची डावी बाजू सोडून उजव्या बाजूने येत असल्याने ओमराजे निंबाळकर यांनी रोडच्या खाली उडी मारली. तेव्हा डंपर पुढे निघून गेला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठीमागून येत असलेल्या मोटरसायकलवर बसून डंपर क्रमांक MH 44 K 8844 चा पाठलाग करून रेल्वे गेट परिसरात त्याला गाठले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
डंपर चालकाला खासदार निंबाळकर आणि गावातील ग्रामस्थांनी जाब विचारल्यास त्याने त्याचे नाव रामेश्वर बंडू कांबळे (रा. अंबाजोगाई जि. बीड ) असं सांगितलं. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेची फिर्याद ढोकी पोलिसांत दिली असून ढोकी पोलिसांत डंपर चालक रामेश्वर कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकार हा चालकाच्या चुकीमुळे झाला? की यामागे काही घातपाताचा हेतू होता का? तसेच ओमराजे निंबाळकर यांच्यावर वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे ओमराजे यांची वडिलांसारखीचं हत्या करण्याचा प्रयत्न होतोय का? अशी चर्चा नागरिकांमध्ये जोरात सुरू आहे.
● मागेही झाला होता हल्ला
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या नायगाव पाडोळी या गावात खासदार निंबाळकर यांच्यावर हल्ला झाला होता. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर 16 ऑक्टोंबर 2019 रोजी चाकू हल्ला झाला होता. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यात ही घटना घडली होती. या हल्ल्यात ओमराजे निंबाळकर यांच्या हाताला दुखापत झाली होती.
खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार कैलास पाटील यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात गेले असताना एका तरुणाने निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला केला. प्रचारात असताना नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्या गर्दीमधून एक तरुण पुढे आला आणि त्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांना हात मिळवला. त्यानंतर दुसऱ्या हाताने त्याने आपल्याकडील चाकू काढून ओमराजे यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. पण ओमराजे यांनी चाकू पाहिला आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आरोपीच्या हातातील चाकू ओमराजे निंबाळकर यांच्या हातातील घड्याळावर लागला. या हल्ल्यात ओमराजे निंबाळकर यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली होती. हल्ला केल्यानंतर त्या आरोपीने जवळच असलेल्या एका दुचाकीवर बसून तेथून पळ काढळा होता.