मोहोळ : मोहोळ नगर परिषदेस माझी वसुंधरा अभियानात राज्यात दुसऱ्या क्रमाकांच्या पुरस्कार मिळाल्या बददल सत्कार सोहळ्यात दंग असतानाच डेंग्यू आजाराने बारा वर्षाच्या बालिकेचा बळी घेतला. ही घटना शनिवारी (ता.10) मोहोळ शहरातील सिद्धार्थ नगरात घडली. Twelve-year-old girl killed by dengue in Mohol city Solapur Majhi Vasundhara Abhiyan Municipal Council
मोहोळ शहर सुंदर आणि स्वच्छ असावे ही तमाम मोहोळकराची इच्छा आहे आणि ती असायलाच हवी शहरवासियांना चांगल्या स्वच्छता राखण्याबाबत सवई लागणेही अपेक्षित आहे, परंतु तसे आहे का ? असा सवाल मोहोळच्या जनतेतून केला जात आहे.
मोहोळ नगर परिषदेस महाराष्ट्र राज्यात स्वच्छतेबाबत असलेल्या माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक मिळाला. ही मोहोळकरांच्या दृष्टीने भूषणावह बाब आहेच यात शंका नाही. परंतु एकीकडे पुरस्काराचा आनंदोत्सव सुरु असतानाच दुसरीकडे १२ वर्षाच्या संस्कृती निरंजन क्षिरसागर या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. ज्या रुग्णालयात उपचार घेतला, त्या ठिकाणच्या डॉक्टरने मुलीचा डेंगूने मृत्यू झाल्याचे सांगितले.
ही घटना नगर परिषद प्रशासनाला आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. परंतु दुसऱ्या एखाद्या संस्कृतीला किवा नागरिकाला जीव गमवावा लागू नये यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. कडक उन्हाळा असताना ही परिस्थिती मोहोळ शहरात असेल तर पावसाळा सुरु झाल्यावर परिस्थिती निश्चितच अवघड होईल, यासाठी पावसाळापूर्व कामे करणे गरजेचे आहे.
गटारीची साफसफाई करणे कचरा कुंड्याची विल्हेवाट लावणे, वाहत्या पाण्याला मोकळी वाट करणे व इतर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा माणसांच्या घराच्या गटारी होतील. यापूर्वी असे प्रकार झालेले आहेत. पावसामुळे गटारीचे पाणी काहीच्या घरात आले होते, तसे होवू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 ऊस बिलासाठी शेतकऱ्याची सोलापुरात आत्महत्या; सात महिन्यात वारंवार हेलपाटे मारुनही निराशा
सोलापूर : रुद्देवाडी (ता. अक्कलकोट) येथील मातोश्री साखर कारखान्याला पाठवलेले उसाचे बिल अद्याप मिळाले नाही. म्हणून दहिटणे (ता. अक्कलकोट) येथील एका ३७ वर्षीय शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना दि. ८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता राहत्या घरी घडली आहे. याबाबत उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र संजय माने (वय ३७, रा. दहिटणे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. याबाबत संजय भीमराव माने यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजेंद्र याचे तब्बल २ लाख १५ हजार रुपये उसाचे बिल ७ महिने झाले तरी यासाठी वारंवार हेलपाटे कारखान्यावर मारण्यात आले असले तरी काहीच उपयोग झाला नाही.
गुरुवारी, (दि. ८ जून) सकाळी घरातील सर्वजण आपापल्या कामाला निघून गेल्यानंतर दुपारी बारा वाजता घरी आला होता. त्यानंतर घरातील स्लॅबच्या हुकास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, असा परिवार आहे.