सोलापूर : नागरी विमानसेवेला अडसर ठरणारी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी आज दुपारी चारच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आली. प्रशासनाकडून 30 मीटर उंचीची परवानगी असताना, कारखान्याने 90 मीटरहून अधिक उंचीची चिमणी उभारली होती. Breaking! At last the Chimney of Siddheshwar Factory is destroyed, Dharmaraj Kadadi is desperate, Solapur Sugar Factory is in tears.
सोलापुरातून नागरी विमानसेवा सुरू होण्यास या चिमणीचा अडसर असल्याचा आरोप होत होता. तसेच चिमणीवरून राजकीय वाद पेटला
होता. अखेरीस सिद्धेश्वरची चिमणी आज प्रचंड बंदोबस्तात पाडण्यात आली.
अप्पासाहेब काडादी यांनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची सुरवात सहकारी तत्त्वावर सुरु केली.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळसह तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कारखान्यामुळे मोठा आधार मिळाला. २८ हजार शेतकरी सभासद व १५ हजारांपर्यंत कामगारांची रोजीरोटी कारखान्यावर अवलंबून असतानाही त्यांचा विचार न करता चिमणी पाडकामाची कारवाई केली जात आहे. ‘मी कोणाचे वाईट केले नाही, तरीपण माझे सोडा, किमान माझ्या शेतकरी व कामगार बांधवांच्या संसाराचा तरी करायला हवा होता’, अशी उद्विग्न भावना व्यक्त करताना धर्मराज काडादी यांचे डोळे पाणावले.
कोणत्याही राजकीय पक्षात नसताना शेतकऱ्यांसाठी काम केले. तरीपण, काहींनी सातत्याने जाणीवपूर्वक त्रास दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. माझ्या बळिराजाचे व कामगारांचे हित न पाहता केलेली कारवाई निश्चितपणे महागात पडेल, असा इशाराही त्यांनी या वेळी संबंधितांना दिला.
धर्मराज काडादी यांनी शेतकऱ्यांचा विचार करूनच कारखान्याची गाळप क्षमता वाढविली होती. विमानतळ विकास प्राधिकरण किंवा नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाशी या कारवाईचा काही संबंध नाही. मात्र, महापालिकेची परवानगी न घेता चिमणी बांधली, यावरून पाडकामाची कारवाई केली जात आहे. ती थांबावावी म्हणून त्यांनी मुंबईत जावून काही मंत्र्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून देखील स्टे घेण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. पण, त्यांना ही कारवाई थांबविण्यात यश आले नाही. शेवटी हतबल होऊन ते आल्या पावली परतले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
चिमणी पाडकाम वेळचे व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
विमानसेवेसाठी वादग्रस्त ठरलेले कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या ‘चिमणी’ वर हातोडा उगारण्याच्या प्रक्रियेला बुधवारी पहाटेपासून अखेर सुरुवात झाली ही प्रक्रिया सलग चार दिवस चालेल, असे सांगण्यात आले होते. मंगळवारी कारखाना परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करून पोलिसांनी कारखाना परिसराचा ताबा मिळविला. कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही, जे तावडीत सापडतील त्यांना उचल की आत घाल’ ही एकमेव भूमिका पोलिसांनी घेतली होती पोलिसांनी इतका लगा बंदोबस्त ठेवला होता की, चिमणीच्या बाजूने भूमिका घेणारे गप्पगुमान झाल्याचे दिसून आले.
चिमणी पाडकामासाठी मनपा आणि पोलीस प्रशासनाने प्रचंड गुप्तता बाळगली होती. कारखाना परिसरात सारा लवाजमा तैनात केल्यानंतर बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून प्रशासनातर्फे चिमणी पाडकाम प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. भल्या पहाटेच सोलापूर महापालिका आणि पोलिसांची यंत्रणा कारखान्यामध्ये चिमणी पाडकामासाठी पुसली. कारच्या परिसरात दीड ते दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. सहाहून अधिक अॅम्बुलन्स कारखाना स्थळावर तैनात केले आहेत. चारही बाजूने सर्व बंद करण्यात आले आहेत. एक किलोमीटर परिसरात सर्व रस्ते सुनसान आहेत.
दरम्यान, या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दरम्यान, सिमेंट काँक्रीटची असणारी ही चिमणी पाहण्यासाठी विविध टप्यावर बुधवारी दिवसभरात हॉल पडले. , जिलेटिनचा स्फोट करू ही चिमणी पाडली जाणार असू ती होल पाडून दो-या आणि तारा बांधून एका बाजूला ओडून पाडली. दरम्यान बुधवारी चिमणीच्या परिसरात विखुरलेले बस इलेक्ट्रिक वायरिंग व इतर अडचणीत ठरत असलेला पसारा हटविण्यात आला होता.