मोहोळ : दुचाकीवरून निघालेल्या तरुणाला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना आज शनिवारी ( दि. १७ ) सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटी गावच्या हद्दीत घडली. Bike rider dies in collision with truck; Incident at Lamboti, truck driver absconding Solapur Mohol
याबाबत मोहोळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील अभिजित राम वाघमोडे (वय -१९) हा मोटार सायकल क्र.एम.एच.१३/ सी.ई.१४३३ यावरून सावळेश्वर येथे नातेवाईकांना भेटण्याकरीता म्हणून मोहोळ ते सोलापूर हायवे रोडने सोलापूरच्या दिशेने जात होता.
आज सायंकाळी ६.३० वा. दरम्यान लांबोटी हद्दीत भारत पेट्रोलियम कंपनीच्या जोशाबा पेट्रोल पंपाचे समोर एम.एच.१२/ एफ.झेड.८७४५ या ट्रकने धडक दिली. अभिजितच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी होवून जागीच मयत झाला. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घेवून लोकमंगल कारखान्याकडे जात असताना पंपावरील लोकांनी त्याचा पाठलाग करून तो थांबविला. चालक ट्रक सोडून पळून गेला.
या प्रकरणी ट्रक चालकावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा. पो. फौजदार ज्योतीबा पवार करीत आहेत.
○ वागदरी बैलगाडी शर्यत वृद्धाच्या मृत्यू ; एका विरुद्ध गुन्हा
सोलापूर – वागदरी (ता.अक्कलकोट ) येथे बैलगाडीच्या शर्यतीच्या वेळी निष्काळजी पणाने बैलगाडी चालवून साहेबलाल म्हताब मुल्ला (वय ६० ) या वृद्ध इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिवप्पा अनिल सोडगी (वय ३२ रा .बासलेगाव ता . अक्कलकोट ) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
३ जून रोजी गावातील परमेश्वर मंदिराजवळ बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवप्पा याने हलगर्जीपणाने बैलगाडी चालवल्याने साहेबलाल मुल्ला हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते ६ जून रोजी मयत झाले होते, अशी नोंद अक्कलकोट पोलिसात झाली आहे. फौजदार मोरे पुढील तपास करीत आहेत .
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ १३ मैल जवळ रिक्षा उलटून दोन महिला जखमी
विजयपूर महामार्गावरील तेरा मैल जवळ वेगाने जाणारी रिक्षा शेतात उलटल्याने पुष्पा सिद्राम कदम (वय ४४ रा . जुळे सोलापूर ) आणि सुवर्णा तातोबा कांबळे (वय ३४ रा.मंद्रूप ता .दक्षिण सोलापूर ) या महिला प्रवासी जखमी झाल्या . हा अपघात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला. त्यांना मंद्रूप येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दोघी दुपारी एक वाजेच्या सुमारास सोलापुरातून मंद्रूप येथे रिक्षातून निघाल्या होत्या. वाटेत चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा शेतात जाऊन उलटली . त्यात दोघी जखमी झाल्या . अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
○ मुंडेवाडी येथे लहान मुलाच्या भांडणावरून लोखंडी पाईपने मारहाण; तिघे जखमी
सोलापूर – लहान मुलास मारहाण केल्याच्या जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर लोखंडी पाईप, काठी आणि लाथाबुक्याने केलेल्या मारहाणीत एका वृद्धासह तिघेजण गंभीर जखमी झाले . ही घटना मुंडेवाडी (ता. पंढरपूर ) येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली .
दगडू हिरामण भोई (वय ६०) त्यांची दोन मुले मनोज भोई (वय ३०) आणि येडू भोई (वय ३५ सर्व रा.मुंडेवाडी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्या सर्वांना काल रात्री १० वाजेच्या सुमारास बबन शंकर भोई, बाळू भोई, सचिन भोई आणि अन्य ६ जणांनी मारहाण केली . अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
● बोरामणी जवळ टेम्पो अडवून चालकास मारहाण
हैदराबाद महामार्गावरील बोरामणी जवळ टेम्पो अडवून लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत मुदस्सर मारूफ कुरेशी (वय ४३ रा.शुक्रवार पेठ सोलापूर ) हे ड्रायव्हर जखमी झाले . ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली . त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . प्रशांत परदेशी आणि इतर ५ जणांनी त्यांना मारहाण केली . अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .