ठाणे – शाईफेक हल्ल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटना शुक्रवारी ( ता. १६ जून) घडली. ठाण्यातल्या कळवा येथे ही घटना घडली. त्यांना कार्यक्रमास ठाकरे गटातील नेते येणार असल्याचे फसवून नेल्याचा आरोप होत आहे. Accused of hurling insults at the woman leader of the Thackeray group and tricking her into the program
Ayodhya Paul
“ठाकरे गटाचा कार्यक्रम असल्याचा बनाव करून मला जाणूनबुजून या कार्यक्रमाला बोलवण्यात आले. मला शंका आली होती. पण भर कार्यक्रमातून उठणे बरे नव्हते. जेव्हा महापुरूषांच्या फोटोला हार घालत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचे सांगत एका महिलेने माझ्यावर शाई फेकली आणि मला मारहाण केली,” असे त्या म्हणाल्या.
अयोध्या पौळ या एका कार्यक्रमासाठी ठाणे – कळवामधील मनीषा नगर येथे गेल्या होत्या. अहिल्या देवी होळकर जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्व महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पौळ यांच्यावर शाई फेकली. त्यांना हा ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात येत असून त्याला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.
सोशल मीडियावर अयोध्या पौळ या ठाकरे गटाची बाजू मांडत असतात. शिवसेनेत उठाव झाल्यानंतर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडण्यात त्या आघाडीवर होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात असलेले आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून त्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
अयोध्या पौळ यांनी हजेरी लावलेला कार्यक्रम हा ठाकरे गटाचा असल्याचे सांगत त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, हा ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून सापळा रचण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, खासदार राजन विचारे, ठाकरे गट ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे हे या कार्यक्रमास येणार असल्याचे सांगण्यात आले होते, असे ठाकरे गटातील काही स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
#Source ठाकरे गटाच्या #अयोध्यापौळ यांच्यावर शाईफेक पोळने बाबासाहेबांबद्दल अपशब्द बोलल्यामुळे स्थानिक महिलांचा राग अनावर झाला व तिला जाब विचारण्यात आला. तिने शिवीगाळ केली असता एका महिलेने तिच्या गालावर शाई लावली व चप्पलने मारहाण करत हाकलून लावले.#AyodhyaPaul #UddhavThackeray pic.twitter.com/O4h5rfc9yR
— 🇮🇳JD🦁࿐ मोदी का परिवार (@JDumde) June 17, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अयोध्या पौळ या सोशल मीडियावर सक्रीय असून ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर नमूद केले होते. त्या मूळच्या परभणी जिल्ह्यातील असून गेली अनेक वर्षे मुंबईतचं आहेत.
यावेळी ठाकरे गटाच्या कोणताही पदाधिकारी या ठिकाणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोळ यांनी त्या ठिकाणावरून थेट पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, गेल्या महिन्यात त्यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना धारेवर धरले होते. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना पौळ विविध मुद्द्यावरून अनेक प्रश्न विचारत असतात.
या घटनेनंतर पौळ यांच्यासह शिवसैनिक व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कळवा पोलीस ठाण्यात जाऊन या हल्ल्याची तक्रार नोंदवली. परंतु रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. कळमनुरी बाजार समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान संतोष बांगर यांनी एक पण केला होता. ते म्हणाले होते की, “१७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही.” मात्र त्यांना १७ पैकी फक्त ५ जागा निवडून आणता आल्या. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी बांगरांना लक्ष केले होते.
अयोध्या पौळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा. एका महिलेवर हल्ला झाला. विरोधी पक्षात आहे म्हणून हा हल्ला झाला. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात झाला. काय करतात पोलीस? हीच का तुमच्या शहरातील महिला कार्यकर्त्यांची सुरक्षा? हा माझा पोलीस आयुक्तांना सवाल आहे, असं राऊत म्हणाले. तिला फसवून कार्यक्रमाला बोलावलं आणि हल्ला केला. हा डरपोकपणा आहे, असा हल्लाबोलही तिने केला.
मी अन् माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन् माझ्या देशाचे संविधान कोणावरही हाच उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते. असलेले हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन् मी ती लढेल. आज माझा शिवसेना पक्ष, माझे नेते उपनेते आमदार अन् लाखो शिवसैनिक माझ्यासोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली. घडलेला सर्व प्रकार लवकरच सांगेन असं अयोध्या पौळ यांनी म्हटले आहे.