सोलापूर – घराजवळ अंघोळ करून कपडे धूत असताना विजेच्या शॉक बसल्याने ५७ वर्षीय पालिका कर्मचारी मयत झाले. ही दुर्घटना भवानी पेठ येथील हनुमान मंदिराजव ळ रविवारी दुपारच्या सुमारास घडली. Municipal employee dies of shock in Bhawani Peth, Solapur despite no electricity connection
खाजप्पा पांडुरंग गजधाने (वय ५७ रा. भवानी पेठ चमडा कारखान्याजवळ ) असे मयताचे नाव आहे. ते आज सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घराच्या बाजूस अंघोळ करून कपडे धुवत होते. त्यावेळी छतावरीत पत्र्याला हाताचा स्पर्श लागल्याने त्यांना शॉक बसून ते बेशुद्ध पडले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मयत झाले.
मयत खाजप्पा गजधाने हे पालिकेतील आरोग्य विभागात कामास होते. त्यांच्या पश्चात २ मुले आणि २ मुली असा परिवार आहे. त्यांच्या घरात विजेचे कनेक्शन नाही. त्यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत वाहिनीतून हा प्रकार घडला. असे नातेवाईकाकडून सांगण्यात आले . या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली असून हवालदार पोव्हळ करीत आहेत .
○ चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
पायी जात असताना चक्कर येऊन पडल्याने महादेव दगडू माने (वय ५५ रा. मड्डीवस्ती,भवानी पेठ) हे जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाले. ते शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घोंगडेवस्ती भाजी मार्केट येथून पायी घराकडे निघाले होते. माजी नगरसेवक पाटील यांच्या कार्यालयाजवळ चक्कर येऊन पडल्याने ते बेशुद्ध झाले . त्यांना सपना (पत्नी) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते रविवारी सकाळी मयत झाले . अशी नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली आहे .
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● गॅसच्या भडक्याने विवाहितेचा भाजून मृत्यू
गॅसच्या शेगडीवर चहा करताना अचानक आगीचा भडका उडून भाजलेली फरजाना कलीम शेख (वय ३५ रा.वाघोली जि . लातूर) ही महिला उपचारादरम्यान सोलापुरातील शासकीय रुग्णालयात रविवारी सकाळी मयत झाली . ५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार लातूर येथे घडला होता . त्यांना लातूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात कलीम शेख पती यांनी दाखल केले होते . उपचारादरम्यान त्या मयत झाल्या .अशी नोंद सिव्हील पोलिस चौकीत पोलिसात झाली आहे .
● भिमाई नगरात रॉडने मारहाण महिलेसह दोघे जखमी
विजापूर रोडवरील भिमाई नगरात घरात घुसून लोखंडी रॉड आणि लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत मेघराज कणीराम जाधव (वय ३०) आणि शितल मेघराज जाधव (वय ३० दोघे रा. भिमाई नगर ) हे जखमी झाले . ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारात घडली . त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही कारण नसताना राहुल चंद्रकांत कदम आणि अन्य ७ जणांनी मिळून त्यांना मारहाण केली . अशी नोंद विजापूर नाका पोलिसात झाली आहे .
● मुळेगाव येथे अपघात; तेलंगणा येथील तिघे जखमी
हैदराबाद महामार्गावरील मुळेगाव तांडा येथे थांबलेल्या ट्रकला पाठीमागून बोलेरो मोटार धडकल्याने ज्योतीबाई मेघनाथ लावण्या (वय २५ ), मुकेश लावण्या (वय २०), आणि मेघनाथ लावण्या (वय २९ सर्व रा.नारायण पेठ,तेलंगणा ) असे तिघेजण जखमी झाले . हा अपघात रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडला . ते सर्वजण टीएस३८-टी- १७८२ या मोटारीतून मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करीत होते. जखमीना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .