पुणे : पुण्यातील दौंडच्या वरवंडमध्ये डॉक्टर नवऱ्याने आपल्या बायकोचा गळा आवळून खून केला. तसेच दोन मुलांना विहिरीत ढकलून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी (दि २०) घडली. The doctor husband left two children with his teacher wife and himself Varwand Daund Pune
अतुल दिवेकर असे या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहित त्यांनी बायकोची गळा आवळून आणि मुलासह मुलीला विहिरीत ढकलून हत्या केल्याचे लिहिले आहे. दरम्यान, यवत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दौंड तालुक्यातील वरवंड येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर ( वय ४२) पल्लवी अतुल दिवेकर (वय ३९), अदिवत अतुल दिवेकर ( वय ९) वेदांती अतुल दिवेकर (वय ६) अशी यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, डॉक्टर अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. नंतर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी जाऊन आत्महत्या करुन कुटुंबच संपवलं.. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून सोडला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अतुल दिवेकर यांनी आत्महत्या करण्याआधी एक नोट लिहून ठेवल्याची प्राथमिक माहिती आहे. या हत्येमागचं आणि आत्महत्येमागचं कारण अजूनही स्पष्ट नाही आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी या कुटुंबियांच्या घरी जावुन तपास केला. दोन लहान मुलांचा मृत्यूदेह सापडला नसून त्यांचा शोध ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस विहिरीचे पाणी काढून सुरू आहे. ही घटना कशामुळे झाली याबाबत अद्याप कारण समोर आलं नाही पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी सुरु केली आहे. विहिरीत मुलांचा शोध घेत आहे. त्या विहिरीजवळ गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. या मुलांचा दुपारपासून शोध सुरु आहे. कौटुंबिक वादातून प्रकार घडला का? किंवा कर्जातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र या संदर्भात कोणतीही ठोस माहिती अजून समोर आली नाही आहे.
डॉ. दिवेकर यांनी प्रथम पत्नीचा खून केला. त्यानंतर दोन मुलांना घेऊन ते घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतातील विहित नेऊन टाकली आणि घरी जाऊन आत्महत्या केली. याबाबत त्यापुर्वी त्याने चिठ्ठी लिहिल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटस आणि यवत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन लहान मुले अद्याप सापडली नसून त्यांचा शोध ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस विहिरीचे पाणी काढून सुरू आहे. ही घटना कशामुळे झाली याबाबत अद्याप कारण समोर आलं नाही पोलीस तपास करीत आहेत.