● भक्तीच्या पालखी सोहळ्यात आरोग्याचा मेळ
● वीस लाख वारकऱ्यांसाठी डॉक्टरांचा ताफा
सोलापूर : परंडा येथे पाच लाख नागरिकांची तपासणी करून विश्वविक्रम केलेल्या सावंत बंधूंनी त्याहीपेक्षा भव्य चारपट मोठे अर्थात २० लाख नागरिकांच्या तपासणीसाठी महाआरोग्य शिबिर पालखी मार्गावर तीन ठिकाणी आयोजित केले आहे. Health fair in Ashadhawar: Mahaarogya camp will be four times bigger than the world record camp, Pandharpur Doctor Shivaji Sawant या रेकॉर्डब्रेक शिबिरासाठी ५ हजार डॉक्टरांचा ताफा असणार आहे. भक्तीच्या पालखी सोहळ्यात होणारा आरोग्याचा मेळा यंदा आकर्षण ठरणार आहे. दरम्यान ‘सुराज्य’ टीमने प्रा. शिवाजी सावंत यांची पंढरपुरात भेट घेतल्यावर त्यांनी शिबिराबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रा. शिवाजी सावंत म्हणाले की, राज्यभरातून शेकडो किलो मीटर पायी चालत जवळपास ४६३ दिंड्या पंढरपूरकडे निम्म्यापेक्षा जास्त अंतर कापत पुढे वाट चालत आहेत. वाखरी येथील पालखी तळासमोर पहिला मोठा कॅम्प उभारला असून येथे जवळपास पाच हजार डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ हजारो वारकऱ्यांवर २७ आणि २८ आणि २९ असे तीन दिवस तपासणी आणि उपचार करणार आहेत.
आरोग्य शिबिरासाठी स्वतंत्र वॉर रूम कार्यान्वित केली आहे. पालखी प्रस्थान ते पालखी प्रवास या दरम्यान ऑक्सिजन, रक्तसाठा यासह १०८ रुग्णवाहिकेसह बाईक अँब्युलन्स तयार ठेवण्यात आल्या आहेत. चंद्रभागेच्या दोन्ही तीरावरही १० खाटांचे तात्पुरत्या स्वरूपात दवाखाने कार्यरत ठेवण्यात आले आहेत. महाशिबिरांच्या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह अग्निशमन यंत्रणा, फिरते शौचालय, फिजिओथेरपी यंत्रणा आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● आरोग्य मंत्री बैठकांमधून घेताहेत आढावा
आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून महाआरोग्य शिबिर होत आहे. एक-दोन दिवसाला संपूर्ण प्रशासन अधिकारी, डॉक्टरांची बैठक घऊन ते शिबिराचा आढावा घेत आहेत. पालखी मार्गावरील सर्व दवाखाने त्यांनी चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य मंत्री सावंत यांनी महाशिबिरांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासनाने केलेल्या नियोजनाची व सोयीसुविधांची पाहणी करत आहेत.
● शिवाजी सावंत, अनिल सावंत यांचे जातीने लक्ष
या संपूर्ण महाआरोग्य शिबिराची यंत्रणा पंढरपूर येथील सांवत निवास येथून प्रा. शिवाजी सावंत आणि त्यांचे पुतणे अनिल सावंत हातळत आहेत. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर ते जातीने लक्ष | देताना दिसत आहेत. डॉक्टरांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था तसेच शिबिरासाठी काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या व्यवस्थेचे उत्तम नियोजन दोघांकडून होत आहे.
● परदेशी डॉक्टरही करणार उपचार
महाआरोग्य शिबिरात ३२ प्रकारच्या तपासण्या आणि त्यावरील उपचाराची व्यवस्था केली आहे. फिरते दवाखान्याच्या मदतीने रुग्णांना तातडीचे उपचार दिले जाणार आहेत. यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागातील मोठ्या रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच परदेशातील ५ तज्ज्ञ डॉक्टरही वारकऱ्यांवर उपचार करणार आहेत.