● ऊसाच्या दरावर कायमचा तोडगा काढण्यात सरकारमध्ये दम नाही
○ भगिरथ भालकेंचा झाला बीआरएसमध्ये प्रवेश
सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. निवडणुकीला अजून एक वर्षाचा काळ शिल्लक आहे. पण या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आतापासूनच वेग आला आहे. BRS is nobody’s team but only farmers’ team, we want to revolutionize farmers’ lives – KCR Bhagirath Bhalke K Chandrasekhar Rao Sarkoli Pandharpur
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपल्या बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे बीआरएसने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपुरातील दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.
भगीरथ भालके यांच्या पंढरपुरातील सरकोली गावात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजित शेतकरी मेळाव्यात भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी बीआरएस पक्षाकडून चांगलंच शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. के चंद्रशेखर राव यांनी यावेळी भाषण करताना ‘अबकी बार, किसान सरकार’ अशी घोषणाबाजी केली. “महाराष्ट्रात बीआरएसचं सरकार आणा, शेतकऱ्यांचा विकास करु”, असं केसीआर म्हणाले.
“बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्र प्रवेशामुळे इतर पक्षात भीतीचं वातावरण का आहे? असा प्रश्न के चंद्रशेखर राव यांनी उपस्थित केला आहे. “बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे, कोणत्याही राजकीय पक्षाची नाही”, असं केसीआर म्हणाले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बीआरएस पक्षाला कमी समजू नका, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज पंढरपुरात के चंद्रशेखर राव यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
“महाराष्ट्रात आमची आता कुठे सुरुवात झालीय. पण महाराष्ट्रातील इतर पक्षांचा इतका आक्रोश का आहे? एवढी भीती का आहे? भाजपचं वक्तव्य, काँग्रेसचं एक वक्तव्य. काँग्रेसने भाजपचं बी टीम म्हटलं. भाजपने आम्हाला काँग्रेसची ए टीम म्हटलं. ही टीम नेमकी कुठून येते? आम्ही कुणाचीच टीम नाही. आम्ही फक्त शेतकऱ्यांची टीम आहोत”, असं के चंद्रशेखर राव म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
केसीआर म्हणाले , आम्ही चार महिने झाले महाराष्ट्रात आलो आणि सर्व पक्ष आमच्यावर टीका करत आहेत. वास्तविक पाहता हे घाबरलेले आहेत, म्हणून चुकीच्या गोष्टी बोलत आहेत. मात्र आमचा नारा आहे की, भारतातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करायची आहे. मंगळवेढ्यातील 35 गावांना पाणी दिले जात नाहीत. सोलापूर, पंढरपूर, अकोला या शहरांत पाणी कमी दिले जाते. मात्र भारतातील जलनितीला उचलून बंगालच्या खाडीत फेकले पहिजे. आता नवीन जलनीतीची गरज आहे. मात्र केंद्र सरकार ते करत नाही.”
के चंद्रशेखर राव म्हणाले, भारतात पाणी, वीज मुबलक आहे. भारतातील वीज नीती बदलली पाहिजे. पुढील 150 वर्षे पुरेल एवढा कोळसा भारतात आहे. मात्र तो ऑस्ट्रेलियात आयात केला जातो. असे असताना खासगीकरण केले जात आहे. महाराष्ट्रात रोज आठ ते दहा आत्महत्या होत आहेत हे ऐकून वाईट वाटते. आम्ही तेलंगणात शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज दिली आहे. पेरणीसाठी एकरी 10 हजार रुपये देतो. राज्यातील सर्व धान्य सरकार खरेदी करते. ऊसाच्या दरासाठी दरवर्षी संघर्ष करावा लागतो. सरकारमध्ये एवढा दम नाही का की,ते ऊसाच्या दरावर कायमचा तोडगा काढू शकत नाहीत, असा टोला लगावला.
डिजीटल इंडिया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी का नाही, मेक इन इंडिया आहे तर चायना बाजार का असतो? वीज कंपन्यांचे खासगीकरण का? बीआरएस ही कुणाची बी टीम नसून शेतकऱ्यांची टीम आहे. खासगीकरूनही शेतकऱ्यांना वीज का मिळत नाही? तेलंगणासारख्या योजना महाराष्ट्रात का नाही, याचा जाब शेतकऱ्यांनी सरकारला विचारावा, असे आवाहन केसीआर यांनी जनतेला केले आहे. शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना तेलंगणा सरकारने दिल्या आहेत. मात्र, इतर राजकीय पक्ष उलटसुलट विधाने करत असल्याचा आरोप केसीआर यांनी केला आहे.