● जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा महत्वपूर्ण निकाल
दक्षिण सोलापूर : भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर ) येथील विद्यमान सरपंच चिदानंद कोटगोंडे यांचे ग्रामपंचायतीच्या निवडणूक खर्चाचा हिशोब विहित नमुन्यात दिला नसल्याच्या कारणाने ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा महत्वपूर्ण निकाल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी दिला आहे. South Solapur. Political upheaval: Sarpanch of Bhandarakawathe Chidanand Kotgonde canceled यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे.
येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक २०२१ मध्ये झालेली आहे. ही ग्रामपंचायत १७ सदस्य संख्येची आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुक ही बाजार समितीचे संचालक वसंतराव पाटील, विठ्ठल पाटील आणि सोसायटीचे माजी अध्यक्ष भिमाशंकर बबलेश्वर, भाजपचे तालुका सरचिटणीस यतीन शहा, माजी सरपंच रमेश पाटील आणि सोमनिंग विरदे यांच्या गटात झाली होती.
या लढतीत पाटील गटाला विद्यमान सरपंच चिदानंद कोटगोंडे यांच्यासह शिवानंद हत्ताळे, सिध्दाराम कुगणे, रविद्र कदम, उपसरपंच सरिता तुरबे, शिल्पा कुंभार, शिल्पा अजावडरे, विजयालक्ष्मी बिराजदार, आश्विनी पाटील असे नऊ जागा मिळाल्या होत्या. तर बबलेश्वर गटाचे स्मिता मुक्कणे, राजेश्री जंगलगी, युक्ता शहा, भिमाशंकर बबलेश्वर, संगप्पा बिराजदार असे पाच जण जिंकले होते. तर कमळे गटाचे सोमनिंग कमळे, रूपादेवी कमळे आणि सलिमा मुजावर असे तीन सदस्य निवडून आले होते.
मात्र सत्तेच्या सारीपटाच्या खेळात पाटील गटाने कमळे गटाचे दोन सदस्यांना आपल्या कौशल्याच्या आधारे कळपात घेऊन बहुमताने सत्ता हस्तगत केली होती. आणि सरपंच पदावर चिदानंद कोटगोंडे तर उपसरपंच पदावर सरिता तुरबे यांचे निवड करण्यात आले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बबलेश्वर गटाचे माजी सरपंच रमेश पाटील यांनी विद्यमान सरपंच चिदानंद कोटगोंडे आणि सिध्दाराम कुगणे यांनी विहीत नमुन्यात निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब दिला नसल्याचे कारण पुढे करून त्यांच्या निवडीला जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच चिदानंद कोटगोंडे आणि ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर कुगणे यांच्याबाबत तक्रार दाखल केले होते.
माजी सरपंच रमेश पाटील यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी सरपंच चिदानंद कोटगोंडे व सिद्धेश्वर कुगणे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करून पुढील सहा वर्ष निवडणुक लढवण्यास बंदी घातल्याचा आदेशात म्हटले आहेत.
○ निकालात दूजाभाव
ग्रामपंचायत निवडणुक खर्चाचा हिशोब विहित नमुन्यात दिला नसल्याबाबात विरोधी गटाकडून आमच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. अशा किरकोळ कारणांवरून आमदारांच्या हस्तक्षेपाने आमच्या गटातील दोन सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी रद्द केले असून अद्याप निकाल हाती आला नाही. आम्ही देखील विरोधी गटाच्या सहा सदस्याच्या बाबत हरकत घेतली असून त्याचा निकालही वेळीच लागावा.
– चिदानंद कोटगोंडे, सरपंच ग्रामपंचायत भंडारकवठे.
○ निकालाचे स्वागत
ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्चाचा हिशोब विहित नमुन्यात दिला नसल्याच्या मुद्यावरून हरकत घेऊन सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. आज निकाल लागला असून त्याचे स्वागत आहे.
– भिमाशंकर बबलेश्वर, ग्रामपंचायत सदस्य, भंडारकवठे