बंगळूर : विरोधी पक्षांची आज बंगळुरुमध्ये बैठक झाली. यामध्ये युपीएचे नाव बदलण्यात आले आहेत. तसेच नव्याने एकत्र आलेल्या विरोधी पक्षाचे नाव Indian National Democratic Inclusive Alliance (INDIA) करण्यात आले आहे. जवळपास 26 पक्षांनी आज विरोधी पक्षांच्या बैठकीला हजेरी लावली होती. Opponents made our ‘INDIA’; The next meeting of the opposition will be held in Mumbai, the unity of 26 parties
Bangalore मल्लिकार्जुन खर्गे, नितीश कुमार, सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे.
बंगळुरू येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधाकांची आघाडी तयार कऱण्यात आली आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील झाले असून या आघाडीचं नाव निश्चित कऱण्यात आलं आहे. या नावाचा अर्थ भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी असा असू शकतो. मात्र याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीत २६ विरोधीपक्ष उपस्थित होते. याच बैठकीत आगामी काळातील नियोजन निश्चित करण्यात आलं आहे.
याआधीच काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छूक नसल्याचं म्हटलं आहे. बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेसने पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. इंडियामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम सारखे तब्बल 26 राजकीय पक्ष सामील झाले आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने शरद पवारांनी पक्ष बांधणीसाठी सभा घ्यायला सुरुवात केली. आज शरद पवार बंगळूर येथे विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत उपस्थित राहिले. यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेत्यांबरोबरचे फोटो शेअर करत सुचक ट्विट केले आहे. “एकत्र लढू आणि जिंकू ” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विरोधी पक्षांची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. बंगळुरुत झालेल्या आजच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच या ठिकाणी युपीएचे नाव बदलून ‘INDIA’ (Indian National Democratic Inclusive Alliance) करण्यात आले आहे. 26 पक्षांच्या सहमतीने हे नाव ठेवण्यात आले आहे, तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे, त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय, असेही खरगे यांनी सांगितले.
देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. कालपासून सुरु झालेल्या या बैठकीत 24 विरोधी पक्ष सहभागी झाले आहे. आज या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप ठरण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुकीसाठी किमान समान कार्यक्रमावर देखील मंथन होणार आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. बंगळुरुतल्या ताज वेस्ट एन्ड येथे हि बैठक संपन्न होत आहे.
● पंतप्रधान पदावरची दावेदारी सोडली
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे विधान केले आहे, “काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी आणि पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही” असे त्यांनी म्हटले. बंगळुरु येथील बैठकीत त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा नवीन वळण येण्याची शक्यता आहे. आमची भावना स्वतःसाठी सत्ता मिळवणे अशी नसून संविधानाचे संरक्षण करणे, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे संरक्षण करणे अशी आहे, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात देखील चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसने पंतप्रधान पदावरची दावेदारी सोडली आहे. ही आघाडी सत्तेसाठी किंवा पंतप्रधान पदासाठी नसल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलं आहे.
या बैठकीच्या निमित्तानं सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी तब्बल दोन वर्षांनी एकमेकांना भेटल्या. तर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचीही यावेळी चर्चा झाली. विशेष म्हणजे काँग्रेसनं पंतप्रधान पदावरची दावेदारी सोडलीय.
या बैठकीच्या निमित्तानं सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी तब्बल दोन वर्षांनी एकमेकांना भेटल्या. तर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचीही यावेळी चर्चा झाली. विशेष म्हणजे काँग्रेसनं पंतप्रधान पदावरची दावेदारी सोडलीय.