अक्कलकोट : भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठे फेरबदल केले आहेत. भारतीय जनता पार्टीने राज्यामध्ये संघटनात्मक बदल केले आहेत. जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची फेरनिवड करण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. Jubilation among workers: MLA Sachin Kalyanshetty re-elected as BJP district president Akkalkot city president Narendra Kale
गेल्या महिना दोन महिन्यांपासून शहर आणि जिल्हाध्यक्ष पदाची निवड होणार अशी चर्चा चालू होती. मात्र काही ना काही कारणास्तव निवड पुढे ढकलण्यात येत होती. या निवडीला आज बुधवारी मुहूर्त मिळाला.
सोलापूर पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष पदासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी यांची फेर निवड करण्यात आली आहे. कल्याणशेट्टी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जातात. गेल्या चार वर्षांपासून कल्याणशेट्टी यांनी भाजपा वाढविण्यासाठी संघटनात्मक बांधणी केली. याचे फलित म्हणून त्यांना पुनश्च संधी मिळाल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● शहराध्यक्ष पदी नरेंद्र काळे
सोलापूर: सोलापुरातील अंतर्गत राजकारणामुळे बाजूला पडलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांची भाजपा सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठे फेरबदल केले आहेत. भारतीय जनता पार्टीने राज्यामध्ये संघटनात्मक बदल केले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहराचे अध्यक्षपदी प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते नरेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापुरातील अंतर्गत राजकारणामुळे बाजूला पडलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांची भाजपा सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर माढा विभाग जिल्हाध्यक्षपदी चेतन केदार-सावंत यांना संधी मिळाली आहे.
गेल्या महिना दोन महिन्यांपासून शहर आणि जिल्हाध्यक्ष पदाची निवड होणार अशी चर्चा चालू होती. मात्र काही ना काही कारणास्तव निवड पुढे ढकलण्यात येत होती. त्याला आज बुधवारी मुहूर्त मिळाला. शहराध्यक्ष पदासाठी नरेंद्र काळे यांच्यासह अनंत जाधव, चन्नवीर चिटे आदी इच्छुक होते मात्र यामध्ये नरेंद्र काळे यांनी बाजी मारली.
यापूर्वी नरेंद्र काळे यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते काही काळ पक्षापासून दूर गेले होते. त्यानंतर मागील तीन महिन्यांपूर्वी त्यांची प्रदेश कार्यकारणीवर निवड झाली होती. आता त्यांची शहराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. नरेंद्र काळे हे यापूर्वी आमदार सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जात होते. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाल्यावर ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटात सामील झाले.