□ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात फक्त इनकमिंग
सोलापूर : राष्ट्रीयकृत तसेच काही सहकारी बँकांनी पिक कर्ज वसूलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची बचत खाती होल्ड केली आहेत. तर त्यांना जामीनदार असणाऱ्या खात्यालाही लगाम लावला आहे. बचत खाते होल्डवर ठेवल्यामुळे खात्यात पैसे जमा होतात परंतु ते काढता येत नाहीत. Solapur Incoming Bank Collector Demands ‘Hold’ Savings Accounts In The Name Of Debt Recovery त्यामुळे ऐन शेतीच्या पेरणी , मशागतीच्या मोसमात शेतकरी अडचणीत सापडला असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बचत खाती सुरू करण्यासाठी बँकांना आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांकडून पिक कर्ज घेतली आहेत. परंतु कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटामुळे शेतकरी पिक कर्ज मुदतीत भरु शकला नाही. त्यामुळे बँकांनी वसूलींच्या नावाखाली खाती होल्ड करून शेतकऱ्यांना वेठीस ठरले जात आहे. पेरणीच्या मोसमात वसूली ची सक्ती करणे अन्यायकारक आहे.
पिक कर्जाची वसूली पिकांची रास होवून शेतमाल बाजारात विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतात. परंतु खरीप पेरणीच्या हंगामात बँकांनी वसूल हाती घेतली आहे. अडचणीतील थकीत कर्जदारांचे बचत खाती बँकांनी होल्ड केली आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मानधन मिळत असून सदर पैसे बचत खात्यामध्ये जमा होत आहेत. तर इतरही अनुदान, विम्याचे पैसे खात्यामध्ये येत असतात. या खात्याला बॅकांनी होल्ड लावून खात्यातील शिल्लक रक्कम देण्यास नकार दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकाना त्वरित लेखी आदेश करून खाती पुन्हा सुरू करून खात्यातील शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
● कारखान्यांनी एफआरपी थकविली, दुधसंघांनी दर कमी केले
कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपिटीमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी सातत्याने वाढत आहेत. मागील वर्षी गारपीट मुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी, बँकांकडून घेतलेल्या पीककर्जाची रक्कम परत करता आली नाही. तर दुसरीकडे साखर कारखान्यांनी अद्यापही एफआरपी पूर्ण शेतकऱ्यांना दिली नाही.
तर दूध संघांनी दुधाचे दर कमी करून अधिक अडचणी तयार केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना थकीत रक्कम भरता आली नाही. परिणामी, पीककर्ज थकीत राहिले आहे. पीक कर्जाची थकीत रक्कम वसुलीसाठी बँकेनी शेतकऱ्यांचे खाते होल्ड केल्याने अडचणीत भर पडली आहे.