○ संवेदनशीलतेचा ‘त्रिशूळ’ दिसून आला
रायगड : इर्शाळवाडीतील दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर पोहचला आहे. पावसामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या सकाळपासून पुन्हा बचावकार्याला सुरूवात करण्यात येणार आहे. Chief Minister Eknath Shinde’s stay: Death toll in Darad disaster rises to 16, success in saving 98 people Raigad Condolences Trishul 103 लोकांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अजूनही काही लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे.
काल रात्री ११ वाजता इर्शाळवाडीवर दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. अजूनही शंभराच्या जवळपास लोकांचा शोध आहेत. काही वेळापूर्वी मुसळधार पावसामुळे शोध मोहीम थांबवण्यात आलेली आहे.दुपारपर्यंत मृतांचा आकडा १२ होता. आता तो आकडा १६ पर्यंत जावून पोहोचला आहे. ९३ जणांना बचाव पथकांनी सुखरुप बाहेर काढलेलं असून जवळपास शंभर जणांचा अजूनही शोध लागलेला नाही. काल रात्री काळ्याकुट्ट अंधारामुळे आणि पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. दिवसभर बचावकार्य सुरु होतं मात्र अडचणींचा सामना करावा लागला.
नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी दरड कोसळली, त्या इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. शिंदे सकाळपासून या परिसरात उपस्थित होते. त्यांनी घटनेचा आढावा घेऊन ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले. अतिशय अवघड पायवाट पार करून आणि तब्बल एक तास पायी चालून मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले आहेत. या ठिकाणी अजूनही पाऊस आहे. रस्त्याच्या नुकसानीमुळे कोणतेही वाहन घटनास्थळी पोहचू शकले नाही.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दीड तास पायपीट करुन इर्शाळवाडीत दुर्घटनाग्रस्त गावाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बचावकार्यात सहभाग घेतला होता. दुसरीकडे अधिवेशन सुरु असल्याने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर त्यांनी कामकाजाची जबाबदारी टाकली असून स्वतः घटनास्थळी मुक्कामी राहण्याचा निर्णय घेतला आहे.
#रायगड जिल्ह्यातील #खालापूर जवळील #इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन येथील परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.
या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. काही ग्रामस्थ भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून गावातील काही मुले आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत… pic.twitter.com/faoC8wAK7R
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच बचाव पथकाला आतापर्यंत 98 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणांकडून सुरू असलेले घटनास्थळावरील बचावकार्य थांबवण्यात आले आहे. दुर्घटनेत जवळपास 20 घरांचे गंभीर नुकसान झाल्याचे समजते. ४८ कुटुंब असलेल्या या गावामध्ये २२८ जण राहत असल्याची माहिती समोर आली असून अजूनही शंभराच्या जवळपास लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
एखादी दुर्घटना घडल्यावर सरकारी यंत्रणा किती प्रभावीपणे काम करु शकते? याचा वस्तुपाठ इर्शाळवाडीच्या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी घालून दिला. खरं तर इर्शाळवाडीची घटना अत्यंत दुर्दैवी, जी कोणाच्याही वाट्याला कधीही येऊ नये. मात्र शासन ‘ आपल्या पाठिशी भक्कमपणे आहे’, हा विश्वास देणेही तितकेच आवश्यक असते, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले. यातून संवेदनेचा त्रिशूळ दिसून आल्याचे म्हटले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असे सांगण्यात येत आहे… ह्यातून लोक सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. तसेच कुठे दरड कोसळू शकतात, ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आतातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा, असे राज ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी इर्शाळवाडी येथील दरड कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. इर्शाळवाडी सारख्या घटना घडल्यानंतर महिना दीड महिना मदत येते पण नंतर पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून मी सातत्याने सांगत आहे की, सरकारने जमिनी विकत घेऊन गावात इमारत उभी करावी. 50 कुटुंबाचे पुनर्वसन करता येईल असा निर्णय सरकारने घ्यावा, असे भास्कर जाधव सभागृहात म्हणाले आहेत.