●भास्कर जाधवांच्या वक्तव्याने वाद
● माफीनाम्याने वातावरण निवळले
● विजयकुमार सरळ माणूस
सोलापूर : माजी खा. किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे राज्यभरात राजकीय वातावरण चांगले तापलेले असताना पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी मात्र सोलापूरच्या अनुषंगाने एक चांगलाच वाद विधिमंडळाच्या आवारात आणि सभागृहात पाहायला मिळाला. The difference between the two Deshmukhs was not known; Vijayakumar’s name was taken instead of Srikanth Deshmukh
Bhaskar Jadhav
एका महिलेच्या प्रकरणात ठाकरे गटाचे आ. भास्कर जाधव यांनी श्रीकांत देशमुख यांचे नाव घेण्याऐवजी आ. विजयकुमार देशमुख यांचे नाव घेतले. त्यामुळे मोठा गदारोळ झाला.
विधिमंडळाचे सभागृह सुरू होण्यापूर्वी माध्यमाशी बोलताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना काही पत्रकाराने किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी आमदार जाधव म्हणाले, भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे प्रकरणात करुणा मुंडे यांना, पूजा चव्हाण यांना संजय राठोड प्रकरणात न्याय मिळाला नाही.
या उलट त्यांना मंत्रिमंडळात घेत त्यांचा सन्मान केला. राहुल शेवाळे आणि बृजभूषणसिंग यांच्यावरही कोणतीच कारवाई झाली नाही. असे उदाहरण देत असताना आ. जाधव यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी निर्मला यादव यांची फसवणूक केल्याचा विषय काढायचा होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मात्र जाधव यांच्याकडून श्रीकांत देशमुख यांच्याऐवजी आ. विजयकुमार देशमुख यांच्या नावाचा उल्लेख झाला. त्यामुळे वाद निर्माण झाला. भास्कर जाधव यांचा व्हिडीओ ऐकल्यानंतर तत्काळ आ. विजयकुमार देशमुख यांनी विधिमंडळाच्या सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांकडे भास्कर जाधव यांची तक्रार केली. माझ्या नावाचा काहीच संबंध नसताना माध्यमांसमोर भास्कर जाधव यांनी नाहक बदनामी केली आहे. जाधव यांनी माध्यमासमोर जाऊन पुन्हा एकदा जाहीर माफी मागून योग्य तो खुलासा द्यावा, अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली.
● दोन देशमुखांमधला फरक कळला नाही
भास्कर जाधव त्वेषाने बोलत असताना सोलापूरचा आणि सोलापूरचे देशमुख असा संदर्भ त्यांच्यापुढे आल्यामुळे त्यांना दोन देशमुखांमधला फरक कळला नाही. त्यांनी श्रीकांत देशमुख यांच्याऐवजी विजय देशमुखांचे नाव घेतल्याने गोंधळ उडाला. दरम्यान, आ. जाधव यांच्या या उतावळेपणाचा सोलापूरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.
प्रेस समोर बोलताना मी जो विजय देशमुख उल्लेख केला तो आमदार विजय देशमुख यांचा नव्हता त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही त्याबद्दल मी सभागृहात महाराष्ट्र समोर खुलासा केला आहे आमदार विजय देशमुख हे सरळ साधे व चांगले व्यक्ती आहेत.
– भास्कर जाधव , आमदार, शिवसेना उबाठा