विरवडे बु : पंढरपूर करकंब रोडवर करकंब (ता पंढरपूर) येथील एका पेट्रोल पंपा समोर भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीस्वारास उडवले. या घटनेत दुचाकीस्वार मयत झाल असून अजय बालाजी चव्हाण (वय 23 वर्ष रा विरवडे बु ता मोहोळ) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. Mohol youth killed in car and motorcycle accident, driver absconding Solapur Virwade Finance Company
या अपघातातील कार चालक फरार झाला असून या अज्ञात कार चालका विरोधात करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विरवडे बुद्रुक तालुका मोहोळ येथील अजय बालाजी चव्हाण हा भारत फायनान्स इन्क्यूजन लिमिटेड कंपनी (शाखा मंगळवेढा ) येथे मागील दोन वर्षापासून काम करीत होता.
काही दिवसापूर्वी त्याची करकंब येथे बदली झाली होती. तो करकंब येते जात असताना त्याची एफ झेड मोटरसायकल एम एच 13 डी 2737 या क्रमांकाच्या दुचाकी गाडीस सकाळी 6.35 वा च्या दरम्यान शिवम पेट्रोल पंपाजवळ करकंब कडून येणाऱ्या सिल्वर रंगाच्या कारगाडीने एम एच 01 ए एच 5397 हिने समोरून जोराची धडक दिल्याने अजय चव्हाण हा जखमी होऊन रस्त्यावर पडला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तेथील स्थनिक नागरिकांनी त्याला जवळच्या जगताप हॉस्पिटल यांच्या रुग्णवाहिकेतून करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून तो मयत झाला झाल्याचे घोषित केले. एकुलता एक मुलगा मरण पावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अज्ञात कार चालका विरोधात मयताचे मामा प्रमोद आवताडे यांनी करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हाचा पुढील तपास करकंब पोलीस करित आहेत.