○ वळसंग सोन्या चांदीचे चोरी प्रकरण; चोर शोधण्यासाठी पोलिसांची सात पथके रवाना
अक्कलकोट : वळसंग (ता. द. सोलापूर) येथे पांडुरंग ज्वेलर्स मधील सोन्या चांदीच्या दागिन्या सह रोख रक्कमेची चोरी झाली. चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीसांचे डॉग स्कॉड घटना स्थळी पोहोचले, डॉग स्कॉड मधील श्वान हे घुटमळत घुटमळत ज्वेलर्स परिसरातील पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ गेले. The dog barked and went to the drain, leading to the empty jewelery box at Pandurang Jewellers, Walsang Akkalkot. त्याचवेळी पोलीसांना ज्वेलर्स चे रिकामे बॉक्स सापडले. सोन्याचे दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांचा महाराष्ट्रासह कर्नाटकात पोलिसांच्या सात पथकाकडून शोध युध्दपातळीवर सुरू आहे.
वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील भर बाजारपेठेत असलेल्या पांडुरंग ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी दुकानातील रोख रक्कम ६६० ग्रॅम सोन्याचे आणि 26 किलो चांदीचे दागिने असा एकूण ३७ लाख ८९ हजाराचा ऐवज पळविला. ही धाडसी चोरी बुधवारी (ता. 23) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरातल ग्रामस्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वळसंग येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर यशवंत महारुद्र चाकूर यांचे पांडुरंग ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी हे दुकान फोडून ६६ तोळे सोने व २६ किलो चांदी असे एकूण ३७ लाख ८९ हजार रुपयांचे दागिने चोरले. मंगळवारी रात्री यशवंत चाकूर हे दुकान बंद करून ते घरी गेले. रात्री एकनंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे चॅनलचे गेट कटावणीने तोडले. त्यानंतर शटरचे कोयंडा तोडून त्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात विक्रीसाठी विविध ट्रेमध्ये ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने काढून घेतले. तसेच चाकूर यांची पत्नी महानंदा यांचे वापरातील सोने व ड्रॉवरमध्ये ठेवलेले एक लाख रुपयेही चोरले होते. वळसंग गावातील आजपर्यंतची सर्वात मोठी चोरी होऊन तीन दिवस उलटले तरी पोलिसांना अद्याप धागेद्वारे हाती लागल नाहीत.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, वळसंग चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी घटनास्थळाला भेट दिली होती.त्यानंतर तपास वेगाने सुरू झाला.ज्वेलर्स परिसरात असलेले सीसी टिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहेत. डॉग स्कॉड मधील श्वान ज्वेलर्सच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ घुटमळत घुटमळत गेल्या नंतर रिकामे बॉक्स पोलिसांना दिसून आले.
● महाराष्ट्रसह कर्नाटक सीमावर्ती भागात करणार तपास
ज्वेलर्स मधील चोरीची घटना घडली, त्यानंतर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ‘, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली युध्दपातळीवर चोर शोधण्यासाठी या चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक, वळसंग चे तीन पथक, अक्कलकोट दक्षिण व उत्तर पोलीस ठाण्यातील पोलिसांची प्रत्येकी एक पथके असे एकूण सात पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके महाराष्ट्र सह कर्नाटक सिमावर्ती भागासह अन्य ठिकाणी चोर शोधण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. लवकरच चोर जेरबंद होतील. अशी माहिती तपास अधिकारी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी दिली आहे.
● पोलिसांना मात्र खुले चॅलेंज
सराफ दुकानाची चोरीची घटना ताजी असताना २७ जुलै रात्री कोरे इंटरप्राईजेस या दुकानाची कुलूप तोडून शटर काढण्याची प्रयत्न केले तसेच मनियार पान शॉप दुकानातून सात हजार रोख रक्कम चोरीची घटना समोर आली आहे. या घटनेने पोलिसांना मात्र खुले चॅलेंज दिल्याचे दिसून येत आहे.
महावितरण वीज पुरवठा कर्मचाऱ्यांनी या चोरीत चोरट्यांना सहकार्य केलेत का ? दोन दिवसापासून रात्रीच वीज का जाते ? वळसंग शाखेचा अधिकारी बदली झाल्याने कर्मचारी कामाकडे दुर्लक्ष करत आहे का ? असे चर्चा व टोमणेबाजी गावातील नागरिकाकडून होत आहे.
वळसंग शाखेला अधिकारी लवकरात लवकर मिळावी असे मागणी सुद्धा केली. गेल्या आठ दिवसापासून येणाऱ्या या सततधार पाऊस व होणारा वीज खंडित तसेच थंड वातावरणामुळे चोरांना फायदा होत आहे. पोलिसांनी रात्री गस्तीत वाढ करावा व महावितरण कर्मचाऱ्यांनी काही धोकादायक प्रसंग वगळून शक्यतो रात्री वीज पुरवठ्याची प्रयत्न करावा असे नागरिकाकडून विनंती करण्यात आली.
गेल्या ८ दिवसापासून पाऊस चालूच आहे. त्यातून विजेच्या लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या वेळी नेहमी वीज जात असते.त्यातूनच हा चोरीचा प्रकार घडला. वळसंग येथील एमएसईबीचे अधिकारी बदलून गेले.त्यामुळे कर्मचाऱ्यांचे विद्युत पुरवठ्याकडे दुर्लक्ष होत आहे का ? अशी चर्चा आणि टोमणेबाजी ग्रामस्यातून होत आहे.गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्तीत वाढ करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे .
दरम्यान या चोरीची फिर्याद दुकानाचे मालक यशवंत महारुद्रप्पा चाकूर (वय ५३ रा . वळसंग) यांनी वळसंग पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अनिल सनगल्ले करीत आहेत.
○ पुन्हा वळसंगमध्ये चोरीचा प्रयत्न
सराफ दुकानाची चोरीची घटना ताजी असताना पुन्हा गुरुवारी (ता. 27) मध्य रात्री वळसंग येथील कोरे इंटरप्राईजेस या दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर मनियार पान दुकान उचकटून ७ हजार रुपये रोख चोरीस गेल्याचे आढळले .सराफ दुकानातील चोरी ही वळसंग परिसरातील पहिलीच मोठी घटना आहे. हा धाडसी प्रकार पाहून चोरट्यांनी पोलिसांना चॅलेंज दिल्याचे चर्चा नागरिकात आहे .