सोलापूर : सोलापुरात संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. Police baton charge Bhide supporters in Solapur Sambhaji Bhide Faujdar Chawdi Police Station Milk Abhishek slogans नंतर ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर हिंदूवादी संघटनेच्या 100-150 कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला.
पोलिसांच्या लाठीचार्जनंतर पोलिसांच्या निषेधार्थ संभाजी भिडे समर्थकांनी घोषणाबाजी कैली. श्री राम सेनेचे राजकुमार पाटील यांचीही बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. भिडे गुरूजींच्या कार्यकर्त्यांना शिवाजी चौकात आंदोनल करताना ताब्यात घेतले होते. अचानक फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर जवळपास ३०० जणांचा जमाव जमला. यावेळी धारकऱ्यांनी मोठमोठ्याने घोषणा देण्यास सुरूवात केली. जमाव पोलिस ठाण्यासमोर वाढू लागला. त्यामुळे पोलिसांना जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याची फौजदार चावडी पोलिसांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून संभाजी उर्फ मनोहर भिडे सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. भिडेंनी महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली होती. याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी संभाजी भिडेंच्या समर्थनात आंदोलन करण्यात येत आहे.
संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली. कोणतीही परवानगी न घेता रॅली काढल्याने पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले. सोलापूर शहरातील शिवाजी चौकात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी आज बुधवारी धारकरी एकत्र आले होते. त्यावेळी फौजदार चावडी पोलिसांनी धारकर्यांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले.
यावेळी ताब्यात घेतलेल्या धारकर्यांना सोडविण्यासाठी फौजदार चावडी पोलिस ठाण्यासमोर जवळपास 300 जण जमले होते. यावेळी धारकरी व पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी धारकर्यांवर लाठीचार्ज केला. १२ धारकर्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
धरपकड, लाठीचार्जसह यांच्या वार्तालापासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आज सायंकाळी चारच्या सुमारास भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ काही धारकरी जमले व त्यांनी आंदोलन सुरू केले. याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी काही धारकरी पुना नाका येथील संभाजी चौकात गेले. तेथे धारकर्यांनी भिडे गुरूजींच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नेले. याची माहिती समजताच जवळपास ३०० धारकरी पोलिस ठाण्यासमोर जमले. पोलिसांनी जमाव जमवू नका, असे सांगितले.
धारकरी व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी काही धारकर्यांनी चॅनलवाल्यांना मुलाखती दिल्या. त्यानंतर घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी पुन्हा त्यांना पोलिस ठाण्यासमोर घोषणा देवू नका, असे सांगितले. त्यावेळी धारकरी मोठ्याने घोषणा देवू लागले. जमाव जास्तच वाढू लागला. परिणामी पोलिसांनी धारकऱ्यांवर लाठीचार्ज केला
पोलिसांविरूद्ध घोषणाबाजी करणाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली. आता पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे पोलिसांनी गस्त देखील वाढविली आहे. सध्या वातावरण शांत आहे