पुणे : प्रसिद्ध निसर्गकवी आणि माजी आमदार ना. धों. महानोर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. Former MLA, naturalist Mahanor’s death Pune hometown cremation यातच आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी उपचारादरम्यान वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 16 सप्टेंबर 1942 ला जन्मलेल्या महानोर यांनी गेली 60 हून अधिक वर्षे कवितेची साधना केली होती. मराठी निसर्गकवी म्हणून त्यांना ओळखले जाते. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महानोर हे 1978 साली महाराष्ट्र विधान परिषदेचे नियुक्त सदस्य झाले होते. महानोरांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला होता. त्यांच्या कविता म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना होता. ना. धों. महानोरांचे पानझड, अजिंठा, तिची कहाणी, पळसखेडची गाणी ही काही प्रसिद्ध कविता संग्रह होते. त्यांचा ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर शरद पवारांनी दुःख व्यक्त केले आहे. माझे जवळचे मित्र व महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. या मृदू मनाच्या निसर्ग कवीला भावपूर्ण श्रद्धांजली, असे त्यांनी ट्वीट केले आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली. दादांच्या (महानोर ) जाण्यामुळे प्रचंड धक्का बसला. महानोर व पवार कुटुंबीयांचे पाठीमागील अनेक दशकांचे नाते आहे. खास करुन ते बारामतीला घरी येत. आल्यावर त्यांच्यात आणि पवार साहेबांच्यात राजकीय चर्चा होत. एखादा विषय बोलून झाला की, ते त्यावर थेट कविताच करायचे, असे त्या म्हणाल्या.
महानोर हे 1978 साली महाराष्ट्र विधान परिषदेचे नियुक्त सदस्य झाले होते. महानोरांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला होता. त्यांच्या कविता म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना होता. ना. धों. महानोरांचे पानझड, अजिंठा, तिची कहाणी, पळसखेडची गाणी ही काही प्रसिद्ध कविता संग्रह होते. त्यांचा ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीटद्वारे शोक व्यक्त केला आहे. ”ना.धो. महानोर ह्यांचं आज निधन झालं. बहिणाबाई चौधरी आणि बालकवी ह्यांच्या कवितेचा वारसा ना.धो. नी समृद्ध केला. ना.धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
याशिवाय ”नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ ही आणि अशी अनेक ना.धों. महानोरांची गीतं महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.”असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. याचबरोबर ”२०१९ ला माझ्या एका भाषणानंतर ना.धो. नी मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जे लिहिलं होतं, ती माझ्या आयुष्यात मला मिळालेली मोठी पोचपावती. ना.धो. महानोरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.” अशा शब्दांत राज ठाकरेंनी ना.धो.महानोरांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
○ ना.धों. महानोर यांना मिळालेले पुरस्कार !
भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार. जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार, पुणे. कृषीभूषण (महाराष्ट्र शासन). ‘वनश्री’ ‘वनश्री ‘कृषिरत्न’ ‘कृषिरत्न’ डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार. साहित्य अकादमी पुरस्कार. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. ‘मराठवाडा भूषण’ वेणू पुरस्कार. अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार. भगवानराव लोमटे स्मृती’ राज्य पुरस्कार.