• विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकापर्यंत आत्महत्येचे ग्रहण
सोलापूर : सोलापूर शहरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेल ध्रुवचे मालक अजिंक्य जयवंत राऊत (वय ५६) यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (ता. ३) दुपारी विजयपूर रस्त्यावरील इंदिरा नगर येथील त्यांच्या निवासस्थानी घडली. Dhruv hotel owner shot and committed suicide Ajinkya Raut Solapur Indira Nagar
शहरातील डफरीन चौक ते जुना एम्प्लॉर्मेट मार्गावर अजिंक्य राऊत यांचे प्रसिद्ध असे ध्रुव हॉटेल आहे. अजिंक्य राऊत हे या हॉटेलचे मालक होते. गेल्या अनेक वर्षापासून शहरात या हॉटेलचा एक नावलौकिक आहे. हॉटेल शेजारी असलेल्या आलिशान अशा जुन्या पध्दतीच्या इमारतीत अजिंक्य राऊत आपले पत्नी व मुलासह राहत होते. सहा महिन्यापासून या निवासस्थानाची डागडुजी होत असल्याने विजापूर रोडवरील इंदिरा नगर येथे पत्नी व दोन मुलीसह राहण्यास गेले होते. गेल्या अनेक दिवसापासून ते आजारी होते. गेल्या आठवड्यात त्यांना उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारातून बरे होऊन ते घरी आले होते.
मात्र गुरूवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते घरी एकटेच असताना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. नरड्याच्या खाली एक मोठी जखम होती. रक्तस्त्राव होत होता. पत्नी व नातेवाईकांनी त्यांना त्या अवस्थेत उपचाराकरिता अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यान ते मयत झाले. शवविच्छेदनाकरिता मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईक मित्रमंडळींनी व हॉटेलिंग मधील कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. सुरुवातीला हॉटेल ध्रुव हे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक आले. नंतर हा प्रकार त्यांनी इंदिरानगर येथील |घरात झाला असल्यामुळे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पथक या ठिकाणी अधिक चौकशीसाठी दाखल झाले. हा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराण्यातील अजिंक्य राऊत यांचाही मोठा मित्र परिवार होता. यात अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सिनेनाट्य कलावंत, उद्योजकांचा समावेश होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहिणी परिवार आहे. हॉटेल ध्रुवचे मालक अजिंक्य राऊत यांचा मृत्यू कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र सध्या अस्पष्ट असून, यासंदर्भात विजापूर नाका पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी पुढील तपास सुरू असून लवकरच कारण समोर येईल असे पोलीस सूत्रांनी बोलताना सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● पॉलिटेक्निक कॉलेजच्या तरुणाने
राहत्या घरी घेतला गळफास
गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक मध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षीय किशोरवयीन तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शिवगंगा नगर भाग ५, कुमठा नाका येथे गुरुवारी सकाळच्या घडली. सुमारास यशराज निरंजन निंबाळकर (वय १७ रा. शिवगंगा नगर भाग ५) असे मयत तरुणाचे नाव आहे.
गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरातील बेडरूम मध्ये छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून (काका) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला.
मयत यशवंत निंबाळकर हा पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेत होता. सकाळी १० वाजेच्या सुमारास तो नाष्टा केला. आणि चुलत्यांना कॉलेजला सोडायला सांगितले होते. ड्रेस बदलण्यासाठी तो बेडरूम मध्ये गेला तो परतला नाही. त्यावेळी खिडकीतून पाहिले ‘असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला. मयत यशराज निंबाळकर यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील निरंजन हे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करतात . या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस झाली आहे.