सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटीवाडी येथे बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. सोलापुरातील एका खाजगी शाळेत सेवक म्हणून काम करणाऱ्या मार्डी येथे धक्कादायक घटना घडली आहे. School constable ends life in farm, grandfather saves daughter-in-law, three grandchildren Solapur Narotewadi खाजगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या हणमंत विठ्ठल काळे या ३६ वर्षीय व्यक्तीने स्वतःच्याच शेतातील शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. १३ वर्षांपासून पगार नाही. त्यामुळे घरात पत्नीशी सतत भांडणे व्हायची. या भांडणाला वैतागून त्याने पत्नी आणि तीन चिमुकल्यांसह जीवन संपवण्याचा प्रयत्न केला मात्र विठ्ठल काळे यांनी त्याची पत्नी ( सूनबाई) व तीन चिमुकल्यांना (नातवंडे) वाचवण्यात यश मिळवले.
पत्नी सुनिता (वय ३२) ही बेशुद्ध पडल्याने तिला उपचारासाठी सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शालार्थ आयडीसाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याने आपल्या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप पोलीस दलातून निवृत्त झालेले विठ्ठल काळे यांनी केल्यामुळे खळबळ माजली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की- काळे फॅमिली ही मूळची मार्डीची. त्यांची नरोटेवाडीत शेतजमीन आहे. मयत मयत हणमंत कांबळे हा सोलापुरातील चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेत शिपाई म्हणून काम करत होता. त्याला १३ वर्षे झाली वेतन मिळाले नाही. वेतन का मिळत नाही म्हणून पत्नीकडून सतत विचारणा होत होती. वेतन मिळावे म्हणून त्याच्याकडून प्रयत्नही सुरू होते परंतु शिक्षण कार्यालयात त्याला अडचणी येत होत्या. त्याच विषयावरून भांडण झाल्यानंतर हणमंत हा रागाच्या भरात पत्नीसह चिमुकल्यांना घेऊन शेततळ्याकडे गेला.
वडील विठ्ठल यांना संशय आला. तेही त्यांच्या मागे गेले. हणमंतने । पहिल्यांदा पत्नीला ढकलले. चिमुकल्यांना ढकलणार होता. तितक्यात विठ्ठल हे शेततळ्यावर पोहचले होते. त्यांनी तीनही चिमुकल्यांना तळ्यापासून लांब सरकावले. तोपर्यंत हणमंतने उडी मारली होती. सुनबाईला कसेबसे वाचवले परंतु मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने उपचारासाठी सोलापूरला पाठवले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गायत्री वय-८ वर्षे, यमुना वय ६ वर्षे आणि मुलगा सुवंश वय २ वर्षे ही मुले आजोबांच्या कृपेने बचावली. शालार्थ आवडी मंजूर न झाल्याने पगार झालाच नाही. हे शालार्थ आयडी बनवण्यासाठी पुण्यातल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती. पगार नसल्याच्या तणावातून हणमंत काळे यांनी | आत्महत्या केल्याचा आरोप त्यांचे वडील विठ्ठल काळे यांनी केला आहे.
जवळपास १३ वर्षांपूर्वी हणमंत हा सोलापुरातील खासगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून भरती झाला. एमकॉम बीएड हीं पदवी असतानाही त्याला शिपाई म्हणून नियुक्त केले. सुरुवातीला त्यांच्या नियुक्ती संदर्भात न्यायालयामध्ये प्रकरण सुरू होते. मात्र न्यायालयाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. त्यानंतर २०१६-१७ साली पगार सुरू करण्यासाठी शालार्थ आयडी बंधनकारक असल्याचा नियम करण्यात आला. तेव्हापासून हणमंत याचा प्रस्ताव शिक्षण विभागातील उपसंचालक कार्यालयात प्रलंबित होता. मात्र शालार्थ आवडीसाठी मंजूर करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यानेच शालार्थ आयडी दिला नाही. त्याच तणावातून मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार विठ्ठल काळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
उच्च न्यायालयाच्या आदेश होऊन देखील त्याला गेल्या १३ वर्षांपासून वेतन मिळाले नव्हते. त्यामुळे तो निराश झाला होता. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास तो पत्नी आणि मुलीला सोबत घेऊन स्वतःच्या शेतातील शेततळ्यात उडी टाकून आत्महत्या करण्यासाठी गेला होता. आवाज ऐकून विठ्ठल काळे शेततळ्याजवळ आले. आणि मुलगा हणमंत आणि सुनेची समजूत घातली. पाठीमागे असलेल्या त्यांचा मुलगा हणमंत काळे यांनी हणमंत आणि सुनेची समजूत घातली. पाठीमागे असलेल्या त्यांचा मुलगा हणमंत काळे यांनी पत्नीसोबत शेततळ्यात उडी टाकली.
● माझ्या मुलाचा जीव अधिकाऱ्यांनी घेतला
घरातील भांडणाची आपबिती विठ्ठल कांबळे यांनी डोळ्यात अश्रू आणून प्रसार माध्यमांना सांगितली. ते म्हणाले की, मी गडचिरोलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवा केली. तब्बल पाच वर्ष सेवा करुन मी आठ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालो. तेव्हापासून कुटुंबाचा उदरनिर्वाह मीच करत आलोय. माझा पगार कधी होईल याच तणावात मुलगा कायम होता.. आज आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी कुटुंबातील माझ्या मुलाचा जीव या अधिकाऱ्यांनी घेतला. ‘शालार्थ आयडीसाठी अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी, तणावातून मुलाने जीव दिला’
● अन् पाण्यात उडी टाकली
पाठीमागे असलेला मुलगा आणि सुन अद्याप का आले नाही. म्हणून विठ्ठल काळे हे आल्यापावली परत शेततळ्याजवळ गेले. तेव्हा पाण्यातून बुडबुडे येत असल्याचे त्यांना दिसले. क्षणाचाही विलंब न करता विठ्ठल काळे यांनी पाण्यात उडी टाकली. आणि सुनेला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पुन्हा पाण्यात जाऊन शोध घेतला. तेव्हा मुलगा हनुमंत हा बेशुद्ध अवस्थेत आढळला. सुनेला खाजगी रुग्णालयात तर मुलाला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता हनुमंत काळे हा उपचारापूर्वीच मयत झाला.