जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढली. अर्धा तास त्या दोघांमध्ये चर्चा झाली, त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. After Manoj Jarange Patil’s hunger strike, Chief Minister Eknath Shinde gave the government one month and 10 days time मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 30 दिवसांचा वेळ देत असून 31 व्या दिवशी सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे, अशी त्यांची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी गावात उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी हजेरी लावल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन संपवण्याची घोषणा केली. यावेळी शिंदे यांनी जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल होण्याची विनंती केली. तसेच त्यांना आधार देत उभे केले. यावेळी इतरही मंत्री पाटील यांना आधार देत होते. पाटील यांच्यासह शिंदे यांनी उपस्थित जनतेचेही हात जोडून आभार मानले. एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर व दोन सरकारी अधिकारी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले. छत्रपती संभाजीनगरवरून जालन्यात दाखल झाले होते. तेथून ते अंतरवाली सराटीत दाखल झाले. जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सध्या चर्चा सुरु आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 30 दिवसांचा वेळ देत असून 31 व्या दिवशी मराठा समाजाला आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे लागतील अशी त्यांची मागणी आहे.
मराठा समाजाला न्याय देऊ शकतात ते फक्त एकनाथ शिंदेच हे मागील काही दिवसांपासून मी सांगत होतो. मराठा आंदोलन स्थळावर आले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. शिंदेसाहेब आपल्याला न्याय दिल्याशिवाय मागे हटणार नाहीत. 50 हजारापेक्षा अधिक लोकांच्या बैठकीत मी सरकारला 1 महिन्याचा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत यावे, अशी अट मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली होती. अखेर त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी आज अंतरवाली सराटी गावात हजेरी लावली. जरांगे पाटील यांचे हे मोठे यश समजले जात आहे. अंतरवाली सराटी गावात मुख्यमंत्र्यांना आणून दाखवलेच, असे यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी आम्ही आणखी दहा दिवस सरकारला देणार, असे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. यावेळी शिंदेंनी, ‘माझ्यावर विश्वास ठेवा, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असे आश्वासन जरांगे पाटील यांना दिले. आंदोलनातील सर्व खटले तातडीने मागे घेतले जातील, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार, आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, ‘ असे ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी एक महिना वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. आता त्यांनी सरकारला मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी एक महिना 10 दिवसांचा वेळ दिला आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची दिल्लीतही चर्चा असल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्र हलवणारा, ये मनोज जरांगे पाटील कौन है ? असे आपल्याला त्या ठिकाणी अनेकांनी विचारले, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. जरांगे पाटील हा सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे, त्याने समाजासाठी काम केले आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.