○ दुहेरी जलवाहिनीच्या जॅकवेलच्या खोदाईचे काम पूर्ण : आयुक्त
○ जॅकवेल डिझाईनची परवानगी आल्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात
सोलापूर :- दुहेरी जलवाहिनीसाठी आवश्यक असणाऱ्या जॅकवेल खोदाईचे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्ष जॅकवेल कामाच्या डिझाईनला संबंधित विभागाकडून तांत्रिक परवानगी आल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. सध्या 20 किमी पर्यंतचे पाईप उपलब्ध झाले असून त्यापैकी नऊ किलोमीटर पर्यंतचे जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे,अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिली. about 9 km of double pipeline work of Solapur is complete
दुहेरी पाईपलाईन टाकण्यासाठी वेगवेगळ्या 82 ठिकाणी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र यापैकी 63 ठिकाणी विविध प्रकारची शासकीय परवानगी आवश्यक आहे. ज्यामध्ये क्रॉसिंग, खोदकाम करण्यासाठी परवानगी यासह इतर विविध बाबींचा समावेश आहे. सोलापूर महानगरपालिकेने एकूण 63 ठिकाणी अशा विविध परवानगी मागितल्या आहेत. त्यापैकी 22 ठिकाणी मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी 8 ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे तर 41 ठिकाणी मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
आजतागायत जवळपास 20 किलोमीटर पर्यंत लागणाऱ्या पाईपचा सप्लाय व्यवस्थितरित्या केला गेला आहे. दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. दुहेरी पाईपलाईनचे काम सध्या नियोजित बार चार्टनुसार होत आहे. या प्रकल्पाच्या कामाचा आढावा दर आठवड्याला आयुक्त स्वतः घेत असल्याचे देखील आयुक्तांनी सांगितले.
○ प्रधान सचिवांनी मान्य केली वाढीव निधीची मागणी
दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाला एकूण 894 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्यापैकी 500 कोटी रुपये स्मार्ट सिटीतून तर 394 कोटी रुपये महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार होते. सोलापूर महापालिका आयुक्तांनी प्रधान सचिवांसमोर दुहेरी जलवाहिनीच्या खर्चाबाबतचे सुधारित सादरीकरण करून या प्रकल्पासाठी निधी देण्याची मागणी केली. प्रधान सचिवांनी त्यापैकी 382 कोटी मंजूर केल्याने आयुक्तांनी प्रधान सचिवांचे देखील आभार मानले. जलशुद्धीकरण केंद्रासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचीही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 विनापरवाना डिजिटल छापल्यास प्रिंटर्सवर गुन्हा दाखल करणार
सोलापूर : शहरात विनापरवाना डिजिटल लावण्याचे फुटल्याने महापालिका प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले आहे. विनापरवाना डिजिटल छापल्यास संबंधित प्रिंटर्सवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच लावण्यात येणाऱ्या डिजिटल फलकावरील मजकुराची महापालिकेमार्फत पोलीस परवानगी घेऊनच त्यास मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिली.
सोलापूर शहरात सर्वत्र विनापरवाना डिजिटल फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. या विरोधात कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले आहे त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सोलापूर शहरात डिजिटल लावण्यासाठी महापालिका झोननिहाय जागा ठरवून देण्यात येत आहेत. डिजिटल लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात येत आहेत.
दरम्यान, वाहतूक पोलीस आणि महापालिका झोन अधिकारी यांचे संयुक्त पथक त्या जागा निश्चितीसाठी संयुक्त पाहणी करीत आहेत. त्यानंतर डिजिटल लावण्याच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. संयुक्त पाहणीनंतर या जागा निश्चित करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा वाहतूक पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार नाही. महापालिकेमार्फतच डिजिटल फलक लावण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
डिजिटल वरील मजकूर तपासण्यात येणार आहे. यामध्ये संवेदनशील भाग आहे किंवा नाही यासाठी महापालिकेकडून ऑनलाईन संबंधित पोलीस निरीक्षक यांना मजकूर तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यता मिळाल्यानंतर परवानगी देण्यात येणार आहे. महापालिका झोननिहाय डिजिटल लावण्याची जागा निश्चित केल्या जात आहेत. त्यानंतर ऑनलाईन या जागा सर्वांना पाहता येईल, असेही महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.
● अन्यथा प्रिंटर्सवर गुन्हा दाखल करणार
दरम्यान, प्रिंटर्स असोसिएशनची यापूर्वीच बैठक घेण्यात आली आहे. लावण्यात आलेले डिजिटल पोलीस व महापालिका प्रशासनाकडून तपासण्यात येणार आहे. ज्या प्रिंटर्सनी महानगरपालिका प्रशासनाचा परवाना न तपासता अनधिकृतपणे डिजिटल छपाई केली असेल तर अशा प्रिंटिंग प्रेस वर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी यावेळी स्पष्ट केले.