मुंबई : ईडीने ऑनलाइन जुगार ऍप महादेव बुक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबईसह देशातील 39 ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये तब्बल 417 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यात गोविंद केडियाच्या घरी 18 लाख रोख रक्कम व 13 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने ईडीला सापडले आहेत. Bollywood actors on ED’s radar, ED raids 39 places Sunny Leone Tiger Shroff Neha Kakkar छत्तीसगडचे रहिवासी असणारे रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ऍपचे प्रमोटर आहेत. याप्रकरणात बॉलिवूडमधील अनेक बड़े अभिनेते ईडीच्या रडारवर आहेत.
कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असल्याच्या संशयातून देशभरात विविध ठिकाणी महादेव ऑनलाईन बेटींग अॅपच्या संबंधित 39 ठिकाणावर ईडीने छापेमारी केली आहे. विशेष म्हणजे या ॲपच्या परदेशातील कार्यक्रमात बोलवण्यात आलेल्या बॉलीवूड कलाकारांना काळ्या पैशातून मानधन झाल्याचा संशय ईडीला आहे. यामध्ये टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक आणि राहत फतेह अली या कलाकारांची नावे आहेत.
महादेव बेटींग अँपच्या माध्यमातून करोडोंची अफरातफर होत असून काही सेलिब्रेटी आणि सरकारी अधिकाऱ्यांना यातून पैसे गेल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रैकेट चालवले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Effective actions taken against the Mahadev APP money laundering networks. Well done!
— Wyn Pang (@Wyni16) September 15, 2023
महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप या कंपनीवर ईडीने छापेमारी केली. यामध्ये तब्बल 417 कोटी रुपये जप्त केले. या कंपनीने आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यामुळे आता हे सेलिब्रिटी देखील ईडीच्या रडारवर आहेत.
महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप कंपनीच्या संस्थापकांपैकी एक सौरभ चंद्राकरच्या लग्नाचा भव्य सोहळा पार पडला. लग्नापेक्षा जास्त तर तो इव्हेंटच झाला होता. या लग्नात बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावत परफॉर्म केले. लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या कंपनीसंदर्भात ईडीने छापेमारी केली असता लग्नाच्या इव्हेंटचीही ईडीने तपासणी केली.
दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी ४१७ कोटी रुपये जप्त केले. या सोहळ्यात १४ बॉलिवूड कलाकार आले होते. टायगर श्रॉफ, सनी लियोनी, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली अजगर, विशाल ददलानी, नेहा कक्कड, भारती सिंह, भाग्यश्री, एली अवराम, पुलकित, क्रिती खरबंदा, कृष्णाभिषेक आणि नुसरत भरुचा यांचा समावेश आहे.
ईडीने ही कारवाई मुंबई, कोलकता आणि भोपाल या शहरांमध्ये केली आहे. महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप कंपनीचे इव्हेंट परदेशातही झाले होते. बॉलिवूड कलाकारांना परफॉर्म करण्यासाठी रक्कम देण्यात आली होती. या इव्हेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ईडीच्या कारवाईनंतर बॉलिवूडकरही चौकशीच्या कचाट्यात सापडतात का हे बघणं महत्वाचं आहे.