नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पुन्हा मागील 24 तासांत आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे 4 दिवसांत मृत्यूचा आकडा हा 51 वर गेला आहे. 2 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. The death throes continue; 100 people claimed to have died, a case of culpable homicide has been registered at Nanded Government Hospital यानंतर 3 ऑक्टोबर रोजी 7 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 4 ऑक्टोबर रोजी 6 जणांनी आपला जीव गमावला. येथील मृत्यूचे प्रमाण थांबले नाही. दरम्यान, अधिष्ठात्यासह काही डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृतांचा आकडा काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण मागील 24 तासांत याच रुग्णालयात आणखी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात तीन बालकांचा समावेश आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत नांदेड शासकीय रुग्णालयात मृतांची संख्या 51 वर पोहचली आहे. 2 ऑक्टोबर रोजी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
नांदेड शासकीय रुग्णालयात मागील चोवीस तासात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला असून, ज्यात 3 बालकांचा समावेश आहे. गेल्या चार दिवसांत या रुग्णालयात मृतांची संख्या 51 वर पोहचली आहे. 2 ऑक्टोबरला सर्वाधिक 24 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 3 ऑक्टोबरला 7 जणांचा मृत्यू झाला. 4 ऑक्टोबरला पुन्हा 6 रुग्णांचा जीव गेला आणि आता मागील 24 तासांत आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे.
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात मागील चार ते पाच दिवसांत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असा धक्कादायक दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याला शासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. औषधा अभावी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे मंत्रीपदी राहण्याच्या योग्य नाहीत. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
असा मृत्यूतांडव सुरु असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. उद्या केंद्रीय गृहमंत्रालयाची बैठक होणार आहे. त्यासाठी शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. दरम्यान, नुकताच शिंदे आणि फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला होता. आता पुन्हा शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तत्काळ भेट देऊन पाहणी करावी, आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे.
उपचारांअभावी रुग्ण दगावल्यांच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडून आज मुंबईत ठिकठिकाणी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ शरद पवार गटाने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. तसेच, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जशी परिस्थिती राज्यात आहे तीच परिस्थिती मुंबईत देखील आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये औषधे नसल्याचा आरोप यावेळी शरद पवार गटाच्या मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव यांनी केला आहे. या वेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला.