● गुणतालिकेत पहिल्या क्रमवारीवर झेप
गांधीनगर : एकदिवसीय विश्वचषकाच्या 12 व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. INDvsPAK- Amit Shah at Maidan; India beat Pakistan Rohit Sharma Ahmedabad या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचे आव्हान ठेवले होते. भारत – पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना गृहमंत्री अमित शाह दिसुन आले. त्यांचा मैदानातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान 7 गडी राखून पूर्ण केले. यासह भारताने वर्ल्डकपमध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या रोहित शर्माने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 36 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. यात त्याने 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले. दरम्यान, वनडेमध्ये 300 षटकार पूर्ण करणारा रोहित तिसरा खेळाडू ठरला आहे.
भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात 2 विकेट्स घेऊन कुलदीप एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे. कुलदीपच्या नावावर आता 93 सामन्यांच्या 90 डावांमध्ये 157 बळी आहेत. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या ब्रेड हॉगचा 123 एकदिवसीय सामन्यांमध्ये 156 बळींचा विक्रम मोडला.
वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. पाकिस्तानचे 6 गडी तंबूत परतले आहेत. पाकिस्तानच्या 168 धावा झाल्या आहेत. अब्दुल्ला शफिक 20, इमाम उल हक 36, बाबर आझम 50, मोहम्मद रिजवान 49, साऊद शकील 6 आणि इफ्तिखार अहमद 4 धावा काढून बाद झाले.
भारतीय गोलंदाजाच्या भेदक मार्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांचा उडालेला धुव्वा आणि त्यांनतर कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज 86 धावांची खेळी आणि श्रेयस अय्यरच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर आज भारताने क्रिकेट वन-डे विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 7 गडी राखत विजय मिळवला. 34 षटकांच्या आत भारताने लक्ष्य साध्य केल्यामुळे रनरेनटमध्ये भारताची सरशी ठरली आहे. यामुळे टीम इंडियाने गुणतालिकेत पहिल्या क्रमवारीवर झेप घेतली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक मारा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीच्या जादूसमोर पाकिस्तानचा डाव पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार बाबर आझम आणि स्टार फलंदाज रिझवान या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने 191धावांपर्यंत मजल मारली होती. 30 षटकांत पाकिस्तानच्या ३ बाद 156 धावा होत्या. यानंतर अवघ्या ३३ धावांत पाकिस्तानने 6 गडी गमावले.
पाकिस्तानच्या संघ अवघ्या 42.5 षटकांमध्येच तंबूत परतला. मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत अवघ्या 191 धावांवर पाकिस्तानला रोखले. पाकिस्तानचा डाव 43 व्या षटकांमध्येच संपुष्टात आला.
192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. सलामीवीर शुभमन गिल पाठोपाठ आणि विराट कोहली आउट झाल्यानंतरही रोहितने आपली दमदार फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाचा विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याने 63 चेंडूत 86 धावा केल्या. यामध्ये ६ चौकार तर 6 षटकार फटकावले.
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार पूर्ण केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावावर 351 षटकार आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर 331 षटकार आहेत. वन-डे विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक षटकार हे रोहित शर्माच्या नावार आहेत.