● जरांगे-पाटलांच्या उपोषणस्थळी संभाजीराजेंची भेट
मुंबई : सरकारला 40 दिवस देऊनही मराठा आरक्षणावर तोडगा न काढल्याने मनोज जरांगे- पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. आता त्यांच्या आंतरवाली सराटीमध्ये उपोषणस्थळी संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली आहे. Something is messed up; Manoj Jarange-Patil warns of Dhangar Maratha reservation, will bring the government to jeers from tomorrow राजे तुम्ही इथे आल्यावर आम्हाला बळ मिळाले, असे पाटील म्हणाले. यावर बोलताना जो प्रामाणिकपणे काम करतो तिथे मी जातो, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली.
मराठा आरक्षणासाठी आम्हाला 40 दिवस दिले आणि धनगर समाजाला 50 दिवस दिले, यात काहीतरी गोंधळ आहे, पण मी छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. यशवंत सेनेच्यावतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. आज आम्ही दिलेल्या डेडलाईनचा शेवटचा दिवस आहे, संध्याकाळपर्यंत आशा आहे, पण आज दिवसभरात काहीच झालं नाही तर उद्यापासून सरकारला जेरीस आणायचे असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला बसण्यापूर्वी गिरीज महाजनांनी त्यांना फोन केला होता. यामध्ये उपोषण करून नये अन् मराठा आरक्षणासाठी वाढीव वेळ द्या, असे महाजन म्हणाले. पण उपोषणावर जरांगे ठाम राहिले. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना एक सरकारी नोकरी द्या अन् आंतरवालीमधील सभेवेळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पाटलांनी केली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी आजपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे. ” गिरीश महाजन म्हणाले होते की, मराठा आरक्षणासाठी 15 दिवस द्या आम्ही 40 दिवस दिले. पण अजून तोडगा निघाला नाही. सरकार हे गांभीर्याने घेत नाही,” असे जरांगे- पाटील म्हणाले. तसेच आरक्षणासाठी कोणीही उग्र आंदोलन आणि कोणीही आत्महत्या करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, काल मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार असल्यचे आश्वासन दिले. मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार, तसेच आरक्षण देताना कुणाच्याही वाट्याचे काढून घेणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात दिले. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. आमरण उपोषणाला आजपासून सुरूवात करत असल्याचे ते म्हणाले. सरकारला दिलेली मुदत संपली आहे त्यामुळे आजपासून आमरण उपोषण सुरू करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी आपण अन्न, पाणी, सलाईन काहीच घेणार नाही असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी सरकारला दिलेली 24 ऑक्टोबरची डेडलाईन संपली आहे. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रात कामावर निघालेल्या कामगारांच्या बस मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या आहेत. कामगारांना कामावर न जाण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केले. मराठा क्रांती मोर्चाकडून आज चाकण औद्योगिक क्षेत्र एक दिवस बंदची हाक देण्यात आली होती.
– मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ म्हणाले होते परंतु अजून घेतले गेले नाहीत.
• सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे
– जाळपोळ करू नका
– आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नका
• उग्र आंदोलन करू नका –
– आजपासून सुरू असलेले उपोषण अत्यंत कडक असेल.
– आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही.