मुंबई : वारकरी संप्रदायावर मोठा आघात झालाय. ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं आज निधन झाले. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. आयुष्यभर वारकरी संप्रदायाची पताका हाती घेऊन वारकरी संप्रदाय वाढवला. Kirtankar Baba Maharaj Satarkar passed away, funeral will be held tomorrow
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (वय 89) यांचे निधन झाले आहे. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांनी 1983 पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. तसेच कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या (27 ऑक्टोबर) संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा महाराज सातारकर यांचे पार्थिव आज दुपारी तीन नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.
ज्येष्ठ निरुपणकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत मालवली ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखदायक आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती होती, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच ज्यांच्या कीर्तनाची ख्याती राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात होती अशा थोर बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असेही पवार म्हणाले.
किर्तनकलेचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आविष्कार, असंख्य भाविकभक्तांचे श्रद्धास्थान आणि आधुनिक काळातील माउली महावैष्णव तसेच वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प. पू. गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची अपरिमित हानी झाली. परमेश्वर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि भक्तगणांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
बाबा महाराज सातारकर यांचे खरे नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा येथे जन्मलेल्या बाबा महाराजांच्या घराण्याला वारकरी वारसा होता. बाल वयातच त्यांची किर्तने गाजू लागली होती. त्यांचे आजोबा दादा महाराज हे ख्यातनाम किर्तनकार होते. त्यांचा वारसा बाबा महाराजांची अतिशय समर्थपणे चालविला. देश-विदेशात त्यांनी हजारो किर्तनांच्या माध्यमातून भागवतधर्माची सेवा केला. बाबा महाराज सातारकर यांचे आज अल्पशा आजाराने नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजाच्या सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आज गुरुवारी त्यांचे पार्थिव दुपारी ३ नंतर अंतिम दर्शनासाठी नेरुळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● थोडक्यात प्रवास
बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी पदवीपर्यंतचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून बाबा महाराजांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. त्यांच्या कुळामध्ये १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा बाबा महाराजांनी पुढे सुरू ठेवली. बाबा महाराज सातारकर परमार्थाचे धडे गिरवण्यासाठी त्यांनी चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांचे शिष्य झाले. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज सातारकर श्री सद्गुरु दादा महाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. वयाच्या अकराव्या वर्षांपासून बाबा महाराज सातारकर यांनी पुरोहित बुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली.
१९५० ते १०५४ या कालावधीमध्ये बाबा महाराजांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. मात्र पुढे परमार्थामध्ये स्वत:ला वाहून घेण्याचा निश्चय करीत हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी होण्याची परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली.