मुंबई : अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. साखळी उपोषण सुरु राहील पण आमरण उपोषण मागे घेतले जाईल, असे त्यांनी म्हटले. सरकारने आज जरांगे पाटलांसोबत चर्चा केली. Success in persuading the delegation; Manoj Jarange Patal’s hunger strike called off, new ultimatum given to government त्यानंतर त्यांनी सरकारला व आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीला काम करण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ वाढवून दिला आहे. मात्र यानंतर वेळ मिळणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील हे मागील नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाला जरांगे पाटलांची समजूत काढण्यात यश आले. जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारला वेळ देण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी म्हटले.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच हा वेळ शेवटचा असेल असेही ते म्हणाले. सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात आज चर्चा झाली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंत वेळ देण्याची घोषणा केली.
मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात आज चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची झालेली चर्चा यशस्वी ठरली. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही त्यांनी दिला.
एक दोन दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नाही. घाई गडबडीत कोणताही निर्णय घ्यायला नको, असं निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगे पाटील यांना सांगितलं. दोन्ही निवृत्त न्यायाधीश जरांगे पाटलांना समजावत आहेत. मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल असा शब्द त्यांनी दिला. मनोज जरांगे यांना भेटायला राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जालन्यात गेलं आहे. हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली.
कायद्याच्या चौकटीत बसणार आणि टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध आहे. प्रत्येक जिल्ह्यात 10 जण मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात काम करतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. ही इतिहासातील पहिली घटना आहे की कायदेतज्ज्ञ उपोषणस्थळी चर्चेसाठी गेले असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्व आंदोलकांना विनंती केली होती की, सणासुदीचे दिवस आले आहेत. दिवाळीचा सण आला आहे. त्यामुळं इतर ठिकाणी सुरु असलेलं उपोषण आंदोलने मागे घ्यावीत असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. कायदा सुव्यवस्था राखणं हे सरकारचं काम आहे. जे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नाहीत ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सरकार दिलेला शब्द पाळेल असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतली आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. 8 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 टायर जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानप्रकरणी सोलापुरात गुन्हा दाखल
मराठा आरक्षण : दोन घटनेत 20 जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर : मराठा आरक्षणाविषयी राज्यभर आंदोलन चालू आहेत. यात सोलापुरातही आंदोलन होत आहेत. यात घोषणाबाजी करून टायर जाळल्याप्रकरणी आणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अशा दोन घटनेत तब्बल वीसजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
घोषणाबाजी करून टायर जळाल्या प्रकरणी दहा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम जाधव,निशांत साळवे,पवन आलूरे,कार्तिक पाटील,राज सरडे,मारुती सुरवसे,श्रीकांत भोसले,गणेश तांदळे,विनायक दत्तू,वैभव कारंडे (सर्व.रा.सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ही घटना काल बुधवारी ( १ नोव्हेंबर ) सोलापूर पुणे हायवे वरील नेक्सा शोरूम समोर घडली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद गुरुसिद्ध होटकर नेमणूक फौजदार चावडी पोलीस ठाणे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
वरील संशयित आरोपी यांनी विनापरवाना एकत्रित येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. या कारणावरून घोषणाबाजी करून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस येण्या-जाण्यास प्रतिबंध करून टायर जाळले आहे.
तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून,पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.
दुस-या घटनेत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती सावंत,नितीन मोहिते,विकास शिंदे,नागेश सावंत,महेश सावंत, प्रशांत फाळके,तात्या गायकवाड,योगेश मोरे,टिल्लू शिंदे,अमोल कळंब (सर्व.रा.मित्र नगर,शेळगी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना काल बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर व सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील मार्केट यार्ड समोरील सिग्नल जवळ घडली. याप्रकरणी पोलीस शिपाई दत्तोबा सूर्यकांत कांबळे नेमणूक जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
वरील संशयित आरोपी यांनी एकत्रित येऊन विनापरवाना घोषणाबाजी करत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस प्रतिबंध करून जीवितहानी होईल असे कृत्य करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास पोसई ताकभाते हे करित आहे.