सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन, सोलापूर महापालिका एन एच एम संघटना व सोलापूर महापालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती यांच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. Elgar called by contract nurses in Solapur; Strong demand for retention in service
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम / जीएनएम / एलएचव्ही / प्रयोगशाळा तंत्रज्ञ / औषध निर्माण अधिकारी / वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचान्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत सेवेत कायम करणे व रिक्त पदावर समायोजन करणे अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना सोलापूर शाखेच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. सुनिता पवार काल शुक्रवारी ( दि.३) नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेविकेचा जीव गेला त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून दहा लाखाची आर्थिक मदत तातडीने द्यावी अशी ही मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस , वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सहा दिवसांपासून नर्सेसनी काळ्या फिती लावून काम करीत आहेत. राज्यस्तरीय आंदोलनाला पाठिंबा दिला. पण दखल घेतली नसल्याने आजपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी – कर्मचारी महासंघ शाखा शहरी आरोग्य अभियान सोलापूरच्या वतीने सोलापूर महापालिकेतील कंत्राटी नर्सेस, वैद्यकीय अधिकारी, टेक्निशियन व फार्मासिस्ट यांनी आज सायंकाळी महापालिका आवारात काम संपल्यानंतर एकत्र येऊन काळ्या फिती लावून निदर्शने केली.
यावेळी शहरी आरोग्य अभियान सोलापूरच्या अध्यक्षा विजया कांबळे, सचिव डॉ. आतिश बोराडे, उपाध्यक्ष रविकिरण माने, संतोष वाघमारे, शाकीर हकीम, सोनाली महिंद्रकर, ज्योती गायकवाड आदींसह नर्सेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
○ या आहेत मागण्या …..
सोलापूर महापालिकेत सन 2015 पासून कंत्राटी पद्धतीवर नर्सेस व इतर कर्मचारी काम करीत आहेत. कोरोना काळातही जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले. सोलापूर महापालिकेत कंत्राटी नर्सेससह इतर कर्मचारी असे एकूण 235 जण कार्यरत आहेत. त्यांना वयाची अट शिथिल करून नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे. या कंत्राटी नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ताही द्यावा. रजा वाढवाव्यात यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान यावेळी “एकच नारा – कायम करा” यासह विविध घोषणा देण्यात आल्या.
या मागण्यांसाठी राज्यस्तरीय संघटनेच्या आदेशानुसार विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.