मुंबई : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या 35 कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये आणि दिवाळी फराळ हे मंत्री तानाजी सावंत देणार आहेत. Big help to families of those who committed suicide for Maratha reservation Bhairavanath Sugar Works आत्महत्या होणे ही दुःखद घटना आहे. आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच संबधित कुटुंबातील मुले यांचे शैक्षणिक पालकत्व आणि मुलामुलींच्या लग्नापर्यंतचा खर्च ते आजपासून उचलणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ३५ जणांच्या कुटुंबीयांना सावंत यांच्या भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते देण्यात आली. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी धनगर समाजातील दोन आत्महत्याग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांनाही मदत करण्यात आली.
सावंत म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कोण त्या कुटुंबाकडे पाहत नाही. आरक्षण आज किंवा उद्या मिळेल आणि विषय संपेल. परंतु, कुटुंब सावरण्यासाठी कळकळीची विनंती आहे की, टोकाचा निर्णय घेऊ नका. हा लढा कशासाठी सुरू आहे ते पहा, शासन आपला निर्णय घेईल. मराठा समाज माझा असून आत्महत्या, आरक्षण हे अंतिम साध्य नाही.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यात चांगलाच गाजत आहे. त्यातच आता एक धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी मागील दोन महिन्यांत तब्बल 19 तरूणांनी आत्महत्या केल्याचे सरकारी आकडेवारीनुसार समोर आले आहे. यात एका तरूणीचा समावेश आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये अनेक तरूण हे तीस वयाच्या आतील होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच मराठा आरक्षणासाठी उपोषण केले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आरक्षणासाठी आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. सरकार त्यांचे काम करत राहील, मात्र मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे मत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.
आत्महत्या केलेल्या ३५ कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये आणि दिवाळी फराळ देण्यात येत आहे. संबधित कुटुंबातील मुले यांचे शैक्षणिक पालकत्व आणि मुले व मुलींचे लग्नापर्यंतचा खर्च मी आजपासून उचलत आहे.’ मागील दोन महिने आरक्षणाबाबत विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत.
मागील वेळी देखील मराठा आरक्षण साठी ५८ मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आले. या दरम्यान ४२ जणांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणे हा योग्य मार्ग नाही. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे चुकीचे आहे. अचानक एखादे वादळ यावे तसे आरक्षण आंदोलने सुरू झाली, असल्याचे मतही सावंत यांनी व्यक्त केले.
मराठा समाजातील मुलांनी समाजासाठी बलिदान दिले आहे. मला अत्यंत दुःख वाटते की, संबधित समूहातील कुटुंबाशी कशी चर्चा करायची? परंतु, समाज प्रबोधन करुन आत्महत्येचा विचार दूर करणे गरजेचे आहे. आत्महत्या हा योग्य मार्ग नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढा देण्यास शिकविले आहे. राज्यात आत्महत्या होणे योग्य नाही. महाराजांची शिकवण लढण्याची आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण काम केले पाहिजे. जीवनात अनेक संकटे येत असतात. पण, त्यांना सामोरे जाताना लढणे गरजे असल्याचे समाजातील लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.