○ प्रेयसीसह पाच जणांवर गुन्हा, दोघांना पोलीस कोठडी
नातेपुते : घरासमोर ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकांबरोबर प्रेम जुळले, लग्न करण्याचे दोघांनीही आणाभाका घेतल्या. दरम्यान तरुणीचे दुसरीकडे लग्न जुळल्याने प्रियकरास समजले. Attempted murder with sword by calling lover Solapur Malshiras relative Tuition teacher निराश झालेल्या शिक्षकोन तिला तू लग्न करून सुखी रहा, असे सांगितले. दरम्यान तिने आपण पळून जाऊन लग्न करू, अशी थाप मारून निर्जनस्थळी प्रियकराला बोलावले. त्यानंतर रात्रीच्या अंधारात पाच जणांच्या मदतीने तिने प्रियकरावर चाकू, तलवार आणि दगडाने हल्ला केला. जखमी अवस्थेत घाबरलेल्या प्रियकराने कॅनालमध्ये उडी टाकून आपला जीव वाचवला. ही सिनेस्टाईल घटना नातेपुते (माळशिरस) येथील फडतरी रोडलगतच्या कॅनालजवळ बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
दिनेश चंद्रकांत फडतरे (वय- ३०, मोरोची, माळशिरस, सध्या रा. नातेपुते) असे गंभीर जखमी झालेल्या खाजगी शिक्षकाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी नातेपुते येथील रुग्णालयात दाखल केले. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची प्रेयसी अंकिता अंकुश कचरे (वय-२०), ओम कचरे (पांढरेमळा, नातेपुते), अनिल अंकुश शिंदे (माण, सातारा) छोटू (पूर्ण नाव नाही) आणि एक अनोळखी इसम अशा पाच जणांविरुध्द नातेपुते पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमन्वये गुन्हा दाखल केला. त्यापैकी अंकिता कचरे आणि अनिल शिंदे या दोघांना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मोरोची येथे राहणारा दिनेश फडतरे हा सध्या नातेपुते येथील पांढरे मळा येथे वास्तव्यास आहे. तो ट्यूशन येत असे. त्याच्या खोलीसमोर अंकिता कचरे ही महाविद्यालयीन तरुणी राहण्यास आहे. इंस्टाग्रामवरून दोघांचे प्रेम जुळले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दोघांनी लग्न करण्याचे ठरविले. दरम्यान, अंकिता कचरे हिचे दुसरीकडे लग्न ठरल्याचे फडतरे याला समजले होते. तेव्हा फडतरेने तिला, तू हवे तिथे लग्न कर. मात्र तुला दिलेले १ लाख रुपये, एटीएम कार्ड आणि कोरा धनादेश आदी परत करण्याची मागणी केली. काही दिवसानंतर अंकिताने त्याला इंस्टाग्रामवरून संपर्क साधला. आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, असे सांगितले.
त्याला बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नातेपुते बायपास रोडवरील फडतरी रोड, कॅनॉलजवळ तिने बोलावले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो कॅनॉलच्या पुलाजवळ गेला होता. त्या ठिकाणी अंकिता थांबलेली त्याला दिसली. तो तिला बोलण्यासाठी पुढे गेला. त्यावेळी अंकितासह पाचजणांनी मिळून त्याच्यावर लोखंडी रॉड, चाकू, तलवार आणि दगडाने मारहाण हल्ला चढवला. त्याला मारहाण केल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या फडतरेने कॅनॉलच्या पाण्यात उडी टाकली. अंधारात काही अंतर पोहून गेल्यानंतर त्याला वस्तीवरील लोकांनी बाहेर काढले. नातेपुते पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, दिनेश फडतरे याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तपास फौजदार दिघे करीत आहेत.