सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या आज गाडीवर चप्पलफेक करण्यात आली आहे. A Rane supporter threw slippers at Sanjay Raut’s car, said the real reason was Solapur सोलापूर दौऱ्यावर असताना चप्पलफेकीची घटना घडली असून हा प्रकार नेमका कुणी केला, याबाबत माहिती समोर आली नाही. शनिवारी पुण्याच्या इंदापूरमध्ये पडळकर यांच्यावर मराठा आंदोलकांनी चप्पलफेक केली होती. यानंतर राजकीय वातावरण तापले होते.
भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत देशात मोठा बॉम्बस्फोट घडवल्याशिवाय निवडणूक जिंकणार नाही, निवडणुकीअगोदर फार मोठा नरसंहार घडवण्याची भीती वाटते. नरसंहार हुकूमशहाच घडवतो. भाजप सध्या हुकूमशाहासारखे वागत असल्याची टिका खासदार संजय राऊत यांनी सोलापुरात व्यक्त केली. भाजप पक्ष नसून, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याचाही आरोप करीत भाजपवर हल्लाबोल केला. सायंकाळी बाळे भागात एका कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याने एकच खळबळ उडाली.
शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. खासदार राऊत यांनी आपल्या दौऱ्याच सुरुवात नेहमीप्रमाणे भाजपवर हल्लाबोल करीत केली. पत्रकार परिषदेत मोदी-शहा यांच्यापासून तीन राज्यांतील भाजपचा विजय, तेलंगणातील
काँग्रेसने मारलेली बाजी, निवडणूक बॅलेट पेपरवर घ्याव्यात, येथपर्यंत सर्व विषयांवर चर्चा केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राम मंदिरावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. राम मंदिर हे काही भाजपची जहागिरी नाही. भाजप रामवर मालकी दाखवत असेल तर रामाच अवमान आहे. राम मंदिर बांधले जात आहे, हे देशवासियांसाठी अविस्मरणीय क्षण आहे. राम हे फक्त भाजपचे नसून, जगातील सर्वांचे प्रेरणास्थान असल्याचे सांगत रामलल्लाचे मार्केटिंग करीत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुलवामा घटना घडल्यानंतर त्यावेळेचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या स्पष्टीकरणावर भाजपमध्ये उत्तर देण्याची हिम्मत नाही. रामलल्लाचा विषय जवळपास संपलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी भीती व्यक्त केली आहे. निवडणुकी अगोदर फार मोठा नरसंहार घडवण्याची भीती वाटते. आता नरसंहार हुकूमशहाच घडवतो, असे खा. राऊत असा टोलाही लगावला.
खा. संजय राऊत सायंकळी बाळे भागातील एका हॉटेलचे उद्घाटन करून आपल्या गाडीकडे जात असताना त्यांच्या गाडीवर बाळे ब्रिजवरून एका अज्ञाताने चप्पल फेकली. राणे यांचा विजय असो, अशी घोषणा तो अज्ञात देऊन गाडीवरून पळून गेला. खासदार संजय राऊत यांच्या वाहनावर सोलापूरात चप्पलफेक करण्यात आली. या प्रकरणी राणे समर्थक सागर शिंदे या तरुणाने कबुली दिली आहे. आपल्याला पुलावर चपल्या मिळाल्या म्हणून चप्पल फेकली. अन्यथा दगड मिळाले असते तर संजय राऊत यांचे डोके फुटलेले दिसले असते, असे त्याने सांगितले आहे. राऊत मोदी, फडणवीस यांच्यावर टीका करतात. मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणतात. त्यामुळे मी चप्पल फेक केली, असे त्याने म्हटले.