नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. Sharad Pawar opposed Maratha reservation, Devendra Fadnavis alleges शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेचं नव्हते. त्यांनी मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध केला. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांना झुंजवत ठेवल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळणार मात्र, ओबीसींवर अन्याय होणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. नागपुरात आज शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
अगदी महाविकास आघाडीचे सरकार असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असे म्हणत हा प्रश्न उडवून लावला होता. त्यांना (विरोधी पक्ष) वारंवार संधी मिळूनही त्यांनी आरक्षण देऊ केले नाही”, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा सर्वाधिक विरोध असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते. तसंच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मोठं आंदोलन सुरू आहे. मात्र, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा होता. शरद पवार यांच्या मनात असतं, तर त्यांनी मराठा आरक्षण दिलं असतं, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केला आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळे म्हणायच्या की, राज्यात मराठा आरक्षणाशिवाय इतर कोणतेही प्रश्न नाहीत. भाजपा सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं. ते आमच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात टिकलं, पण भाजपा सरकार गेल्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल. मात्र, ओबीसी समाजावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही. ओबीसी आरक्षणावर कोणतंही संकट येऊ देणार नाही, असं आश्वासन भाजपानं दिलं आहे. भाजपामधील ओबीसी, मराठा कार्यकर्त्यांना आपल्या समाजाची बाजू योग्य वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, आपला पक्ष प्रत्येक समाजाला न्याय देईल, असा विश्वास दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांनी ठेवला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले, “शरद पवार आणि विरोधकांच्या मनात असते तर मंडल आयोग लागू झाला, तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. त्यांच्या मनात असते तर सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे येण्याआधीही आरक्षण देता येऊ शकले असते. पण त्यांना कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना समाजा-समाजाला फक्त झुंजवत ठेवायचे होते. लोकं झुंजत राहिले, तर आपले नेतेपद कायम राहिल, ही त्यांची मानसिकता आहे. आमचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. केवळ आरक्षण दिले नाही, तर ते उच्च न्यायालयात टिकवून दाखविले. सर्वोच्च न्यायलायात आपले सरकार असेपर्यंत ते टिकले. पण सरकार गेल्यानंतर त्यावर स्थगिती आली