मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. तो अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. तेथून घरी आल्यावर तो जागीच कोसळला. त्याला तातडीने अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले. Shreyas Talpade suffers acute heart attack; Bobby Deol disclosed तेथे त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समजत आहे. श्रेयसची तब्येत बिघडली,असे कळताच त्याच्या चाहत्यांनी त्याला बरे वाटावे यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.
अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. चाहते सोशल मीडियातून चिंता व्यक्त करत होते. डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आज किंवा उद्यापर्यंत श्रेयसला डिस्चार्ज मिळू शकतो. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली होती.
अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातच अभिनेता बॉबी देओलने श्रेयसच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. मी श्रेयसच्या पत्नीशी बोललो. ती खूप अस्वस्थ वाटत होती. त्याचे हृदय 10 मिनिटांसाठी बंद पडले होते. पण, आता त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करूया, असे तो म्हणाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काल गुरुवारी अभिनेता श्रेयस तळपदे हा ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्याने काही अॅक्शन सीन आणि या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले मात्र, घरी आल्यानंतर त्याची अचनाक तब्येत बिघडली त्यामुळं त्याला गुरुवारी अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस तळपदे याच्यावर गुरुवारी रात्री १० च्या सुमारास अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आता श्रेयसची तब्येत बरी असून, तो एकदम ठीक आहे. त्याच्यावर अँजिओप्लास्टीची सर्जरी यशस्वीपणे पार पडली आहे. पुढील काही दिवसांत त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलने दिली आहे.
श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेनं एक निवेदन ‘एक्स’वर पोस्ट केलं आहे. यामध्ये तिनं त्याच्या हेल्थची अपडेटही दिली आहे. तिनं सर्व मित्र आणि मीडियाला विनंती करताना लिहिलंय, ”माझ्या पतीची प्रकृती बिघडल्यानंतर तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. त्याची तब्येत आता स्थिर आणि बरी आहे. काही दिवसातच त्याला डिस्चार्ज मिळेल हे सांगताना आनंद होतोय.”
दीप्ती तळपदेनं पुढं लिहिलंय, ”या काळात मेडीकल टीमने घेतलेली काळजी आणि वेळेवर दिलेला प्रतिसाद महत्त्वाचा ठरला आहे आणि आम्ही त्यांच्या कौशल्याबद्दल आभारी आहोत. त्याची तब्येत पूर्ववत होईपर्यंत आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा ही नम्र विनंती. तुमचा अतूट पाठिंबा आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्रोत आहे.” दीप्ती श्रेयस तळपदेनं शेअर केलेल्या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.