○ १५ किलोमीटरपर्यंत धावपळ, पोलिसाच्या भीतीने मुंडके शेतात फेकले
सोलापूर : जमिनीच्या वादातून धडावेगळे केलेले मुंडके शेवरे (माढा) येथे जमिनीच्या वादातून वृध्द चुलत्याचा खून करून त्याचे मुंडके घेऊन पसार झालेल्या आरोपीपैकी एकाला पोलिसांनी अटक केली. Cousin killed and scalped; Remand the nephew for seven days त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी दिला आहे.
दरम्यान, धडावेगळे झालेले मुंडके घरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील एका शेतात पोलिसांना आढळले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश बाबासाहेब जाधव (वय-३०) असे असून, त्याला न्यायालयाने दि. १८ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजण्याचा सुमारास घडली. आरोपी मयताचे मुंडके सोबत घेऊन गेल्याने रात्री उशीरा पर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. मंगळवारी माळीनगर (माळशिरस) येथे मयत व्यक्तीचे मुंडके सापडल्यानंतर मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शंकर प्रल्हाद जाधव (वय-६५) असे मयत वृध्दाचे नाव आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मयत शंकर प्रल्हाद जाधव व त्यांच्या सावत्र भावांची चार मुले शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर जाधव, आकाश जाधव, अजित जाधव यांचा कुरण वस्ती (शेवरे, माढा) वडोली हद्दीतील जमिनीबाबत वाद होता. मयत शंकर जाधव यांचा मुलगा अमोल जाधव व इतर घरातील सर्व वडोली येथील शेतात काम करण्यासाठी गेले होते. काही दिवसापुर्वी मयत शंकर जाधव यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याने ते घरात एकटे झोपून होते.
सकाळी १०.३० वाजण्याचा सुमारास आरोपी शिवाजी जाधव याच्यासह चौघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तिघांनी त्यांना पकडले तर शिवाजी जाधवने त्यांच्या गळ्यावर वार करून मुंडके धडा वेगळे केले. आणि त्यांचे मुंडके घेऊन शिवाजी जाधव हा दुचाकीवरून पसार झाला. अशी फिर्याद मयताचे नातू नरहरी नवनाथ बंडलकर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे.
घटनास्थाना पासून मयताचे धडा वेगळे केले. मुंडके १५ किलोमीटरपर्यंत घेऊन आरोपीने मोटारसायकलवरून संगम ते अकलूज असा प्रवास केला. पोलिसांच्या भीतीने त्याने अकलूज परिसरातील एका शेतात मुंडके फेकून देऊन पसार झाला. पोलिसांनी मुंडके जप्त केले.